3000 कोटींचा मालक असलेल्या ‘या’ अभिनेत्याचं तब्बूशी ‘अफेअर’, अशी होती चर्चा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – साऊथ सुपरस्टार नागार्जुनचा आज वाढदिवस आहे. आपल्या युनिक अ‍ॅक्टींगने नागार्जुनने साउथ इंडस्ट्रीसोबत बॉलिवूड प्रेक्षकांचंही मन जिंकलं आहे. 1992 साली त्याने श्रीदेवी आणि अमिताभ बच्चनच्या खुदा गवाह या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पाऊल टाकलं होतं. परंतु त्याआधी ते साऊथमधील मोठं नाव होतं.

नागार्जुन आपल्या अफेअरला घेऊनही खूप चर्चेत राहिला आहे. नागर्जुनचं नाव बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस तब्बू सोबतही जोडलं गेलं आहे. परंतु विवाहित असल्याने नागार्जुन तब्बूसोबत लग्न करू शकला नाही. नागार्जुन अ‍ॅक्टरसोबतच यशस्वी प्रोड्युसर आणि बिजनेसमन देखील आहे. त्याची संपत्ती कोटीमध्ये आहे. नागार्जुन साऊथमधील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांपैकी एक आहे. नागार्जुन आणि त्याच्या परिवाराची प्रॉपर्टी जवळपास 3 हजार कोटी आहे.

https://www.instagram.com/p/BsFygtlH1nl/

नागार्जुन अन्नपूर्णा स्टुडिओ प्रॉडक्शन कंपनीचा मालक आहे. हा स्टु़डिओ जवळपास 7 एकरमध्ये पसरला आहे. याशिवाय तो अन्नपूर्णा इंटरनॅशनल स्कुल ऑफ फिल्म अँड मीडिया, हैद्राबादचा प्रेसिडेंटही आहे. सोबतच तो एमएनएन रिअ‍ॅलिटी एंटरप्रायजेसचे फाऊंडिंग मेंबरही आहे.

https://www.instagram.com/p/Bo88_plnizz/

आपल्या बक्कळ कमाईमुळे नागार्जुन फोर्ब्सच्या यादीत दोन वेळा(2012 आणि 2013) झळकला आहे. त्याच्याकडे अनेक महागड्या गाड्या आहेत. यात रॉल्स रॉयस, रेंज रोवर, बीएमडब्ल्यू आणि पोर्शे या गाड्यांचा समावेश आहे.

पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेतल्यानंतर नागार्जुनने अमला अक्किनेनीसोबत दुसरं लग्न केलं आहे. या शिवाय तब्बूसोबतच्या रिलेशनशिपमुळेही तो चर्चेत राहिला आहे. तो विवाहित असल्याने दोघांचं लग्न झालं नाही. तब्बूचंही त्याच्यावर खूप प्रेम होतं. तब्बूने लग्न न करण्याचं कारणंही नागार्जुन आहे असं सांगितलं जात आहे.

https://www.instagram.com/p/BnHCNdBB1kg/

https://www.instagram.com/p/BnHB_XBhXJS/

https://www.instagram.com/p/BnHBEoNBw2y/

https://www.instagram.com/p/BlSa1DHhL5q/

https://www.instagram.com/p/Bj5gfwyhUug/

https://www.instagram.com/p/BiIBchtBJqW/

https://www.instagram.com/p/BfnSukkBA4m/

https://www.instagram.com/p/BeJYQnuBFtU/

https://www.instagram.com/p/BbMm315gR-f/

https://www.instagram.com/p/BbuiKC4hNss/

आरोग्यविषयक वृत्त –