Nagpur Crime News | पोलिसांच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यु; पोलीस व्हॅनवर धडकल्याने केली मारहाण, नागपूरात तणाव

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama online) – Nagpur Crime News |मद्यपी तरुणाच्या दुचाकीची पोलीस व्हॅन (Police van) ला धडक बसल्याने संतप्त झालेल्या पोलिसांनी त्याला बेदम मारहाण केली. या मारहाणीत तरुणाचा मृत्यु (Death) झाला. या घटनेमुळे पारडी परिसरात मध्यरात्रीपर्यंत प्रचंड तणाव निर्माण झाला होता. Nagpur Crime News | youth died due police beating nagpur

मनोज हरिभाऊ ठवकर (Manoj Haribhau Thawkar) असे मृत्यु (Death) पावलेल्या तरुणाचे नाव आहे. ठवकर हा पारडी परिसर (Pardi area) राहत होता. तो दिव्यांग असून मोटार मेकॅनिक (Motor mechanic) होता. त्याच्यामागे पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. मनोज याच्या जाण्याने हे कुटुंब निराधार झाले आहे.

याबाबतची माहिती अशी, पारडी परिसरात मनोज ठवकर हा बुधवारी रात्री ९ वाजता मद्य प्राशन करुन दुचाकीवरुन जात होता. त्याने पोलीस उपनिरीक्षक शिंदे यांना कट मारुन पुढे जात असताना पोलिसांच्या गस्ती वाहनांना त्याची दुचाकी धडकली. त्यामुळे  संतप्त झालेल्या पोलीस व्हॅनमधील पोलिसांनी ठवकर याला बेदम मारहाण केली. आधीच मद्य प्राशन करुन आलेल्या ठवकर यांची प्रकृती या मारहाणीमुळे अस्वस्थ झाली. तो निपचित पडला. हे पाहून पोलीस हादरले. त्यांनी त्याला श्री भवानी हॉस्पिटल (Shri Bhavani Hospital) मध्ये दाखल केले. तेथे डॉक्टरांनी ठवकर याला मृत घोषित केले. या घटनेचे वृत्त परिसरात समजताच नागरिकांनी हॉस्पिटलबाहेर एकच गर्दी केली. मनोज याला पोलिसांनी मारहाण करताना पाहणार्‍या नागरिकांनी या घटनेची माहिती जमलेल्या लोकांना दिली. त्यातून संतप्त झालेल्या लोकांनी पोलिसांविरोधात घोषणाबाजी सुरु केली.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram,
facebook page and Twitter for every update

या घटनेची माहिती समजताच अनेक वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. त्यांनी जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला.
मात्र मनोज याचा मृत्यु पोलिसांच्या मारहाणीमुळे झाला.
त्यामुळे त्या पोलिसांना अटक करा, अशी मागणी करुन जमावाने पोलिसांच्या नावाने घोषणाबाजी सुरु ठेवली होती.
तणाव वाढत असल्याचे दिसल्यावर हॉस्पिटलच्या परिसरात अतिरिक्त पोलिसांचा बंदोबस्त मागविण्यात आला. शीघ्र कृती दलाचे पथक हॉस्पिटलबाहेर तैनात करण्यात आले.
तरीही जमाव शांत होत नव्हता.
कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर मध्यरात्रीनंतर जमाव शांत झाला असला तरी परिसरात तणाव कायम आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram,
facebook page and Twitter for every update

Web Title : Nagpur Crime News | youth died due police beating nagpur

हे देखील वाचा

Pune Police News | 27 वर्षीय तरूणीवर लग्नाच्या आमिषाने बलात्कार, पोलिस कर्मचार्‍याला पोलिस कोठडी

Basmati Rice | ‘किंग ऑफ राईस’ – बासमती चे उत्पादन कमी – ‘फाम’चे वरिष्ठ उपाध्यक्ष राजेश शहा

Modi Cabinet Expansion | केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर नारायण राणेंनी मानले ‘या’ 4 जणांचे आभार