Nagpur Crime | भाजप नगरसेवकाच्या घरातून चोरट्यांनी तिजोरी पळवली, 50 तोळे सोनं अन्…

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – चोरट्यांनी भाजप नगरसेवकाच्या घरातील तिजोरी लंपास (thieves snatched safe) केली. तिजोरीत 40 ते 50 तोळे सोने, गोल्ड प्लेटेड घड्याळ आणि इतर मौनल्यवान वस्तू होत्या हा प्रकार नागपूरमधील (Nagpur Crime) गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या (Gittikhadan Police Station) हद्दीत उघडकीस आला आहे. भाजपचे नगरसेवक संदीप गवई (BJP corporator Sandeep Gavai) यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली आहे. रविवारी (दि.24) सकाळी उघडकीस आलेल्या घटनेमुळे नागपूर शहर (Nagpur Crime) आणि परिसरात खळबळ उडाली आहे.

भाजप नगरसेवक संदपी गवई हे रमा नगर, शताब्दी चौक परिसराचे नेतृत्व करतात. ते गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हजारिपहाड (Hazaripahad) परिसरात राहतात. त्यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, 17 ऑक्टोबर रोजी ते नागपूर (Nagpur Crime) बाहेर गेले होते. त्यावेळी घरात त्यांचे नातेवाईक होते. 22 ऑक्टोबरला ते परत आले. आज (24 ऑक्टोबर) त्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन त्यांच्याकडे चोरी झाल्याची (Nagpur Crime) माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

Rupee Bank | रूपी बँकेच्या 4.96 लाख ठेवीदारांना डिसेंबरपर्यंत मिळणार 5 लाख रूपयांपर्यंतच्या ठेवी, जाणून घ्या

गवई यांच्या खोलीमध्ये असलेली तिजोरी चोरट्यांनी उचलून नेली. या तिजोरीत 40 ते 50 लाखांचा किमती ऐवज होता असे समजतेय. या धाडसी चोरीचे वृत्त समजताच परिसरातील नागरिकांनी गवई यांच्या निवासस्थानी गर्दी केली. पोलिसांनी श्वान (Dog squad) तसेच ठसे तज्ज्ञांचे (fingerprint experts) पथक बोलवून घेतले. घराच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही ताब्यात घेतले आहे.

धाडसी चोरीबाबत पोलिसांना संशय

चोरीची घटना घडल्यानंतर दोन दिवसांनी गवई यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली.
त्यामुळे या धाडसी चोरीत अनेक संशयास्पद पैलू आहेत.
चोरट्यांनी घरातील कोणत्याच दुसऱ्या वस्तूंना हात लावला नाही किंवा छेडछाड केली नाही.
फक्त तिजोरीच उचलून नेली. ही बाब पोलिसांना खटत आहे.
त्यामुळे या प्रकरणात संपर्कातीलच व्यक्ती असल्याची प्राथमिक शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
महत्त्वाचे म्हणजे गवई दोन दिवसांपूर्वी घरी परतले आणि त्यांनी आज चोरीची माहिती पोलिसांना कळवली.
या दोन दिवसात त्यांना आपल्या घरात चोरी झाल्याचे कसे समजले नाही, याच मुद्यावरुन पोलिसांनी तपास सुरु केल्याचे सांगण्यात येत आहे.

हे देखील वाचा

Solapur Crime | दुर्दैवी ! जीममध्ये व्यायाम करताना डॉक्टरचा मृत्यू, सोलापूरच्या मोहोळमधील घटना

Aryan Khan Drugs Case | ‘किंग’ खान ‘शाहरूख’कडे 25 कोटींची मागणी ! 18 कोटींवर डील झाली; NCB च्या वानखेडेंना 8 कोटी द्यायचे असं बोलणं सुरु होतं, ‘त्या’ बॉडिगार्डचा दावा

Pune Crime | इंस्ट्राग्रामवर बनावट अकाऊंट तयार करुन तरुणीने केली तरुणाची बदनामी

 

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Nagpur Crime | thieves snatch lot of gold from safe of bjp corporator sandeep gavais house

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update