Nagpur Suicide News | ‘तुला उद्या गूड न्यूज मिळेल…’ असा मेसेज पाठवत महिलेने आपल्या मुलीसोबत उचलले ‘हे’ पाऊल

0
144
Nagpur Suicide News | a suicide 28 year old woman jump in lake with a girl
file photo

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – Nagpur Suicide News | नागपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका 28 वर्षीय महिलेने आपल्या तीन वर्षांच्या मुलीसह अंबाझरी तलावात उडी घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. ही घटना सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली आहे. कल्पना रवी पंडागळे आणि स्विटी या मायलेकींची नावे आहेत. (Nagpur Suicide News)

 

काय आहे नेमके प्रकरण?
कल्पना सोमवारी रात्री मुलीला घेऊन अंबाझरी तलावावर आली. तिने तलावाच्या काठावर बसून मुलीला खाऊ घातले. त्यानंतर तिने आपल्या नवऱ्याला ‘तुला उद्या गूड न्यूज मिळेल, शेवटी एकदा मुलीचा चेहरा बघायचा असेल तर सांग’, असा संदेश पाठवला आणि तिने मुलीला कडेवर घेऊन अंबाझरी तलावात उडी घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला. (Nagpur Suicide News)

 

कल्पना तलावात उडी घेत असताना एका युवकाने तिला पहिले.
यानंतर त्याने तेथील नागरिकांना याची माहिती दिली. अंबाझरीचे ठाणेदार गजानन कल्याणकर यांना या घटनेची माहिती मिळताच सहायक निरीक्षक संतोष बोयणे यांना घटनास्थळी पाठवले.
संतोष बोयणे यांनी घटनास्थळाची पाहणी केली असता तलावाच्या काठावर एका चिठ्ठीत कल्पनाची आई, पती, आणि
भावाचा मोबाईल क्रमांक लिहून ठेवलेला आढळला.
यानंतर पोलिसांनी अग्निशमन दलाच्या सहाय्याने तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. अंबाझरी पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

 

Web Title :- Nagpur Suicide News | a suicide 28 year old woman jump in lake with a girl

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Annie Wersching | हॉलीवुडच्या ‘या’ अभिनेत्रीचे कॅन्सरने निधन; वयाच्या 45 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Maharashtra Cabinet Meeting | शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले 15 महत्वाचे निर्णय, जाणून घ्या सविस्तर

Anil Parab | ‘मराठी माणसाच्या हिताच्या आड कुणी आलं तर मी आणि शिवसेना गप्प बसणार नाही’; अनिल परब यांचा किरीट सोमय्या यांना इशारा