नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणी जालन्यातून माजी नगरसेवकाला अटक

जालनाः पोलीसनामा आॅनलाईन

 

नालासोपासा शस्त्रसाठा प्रकरणी महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने आणखी एकाला जालन्यातून अटक केली. श्रीकांत पांगारकर असं या व्यक्तीचं नाव आहे. पांगारकर हा जालना नगर परिषदेचा माजी नगरसेवक आहे. गेल्या तीन वर्षांपासून तो औरंगाबादमध्ये राहत असल्याची माहिती आहे. पांगारकरच्या जालन्यातील घराची झाडाझडती घेतल्याची माहितीही समोर आली असून, कट्टर हिंदूत्ववादी अशी अोळख त्याची अोळख आहे.

[amazon_link asins=’B01MUUPL3Y’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’7af426f4-a450-11e8-b3f1-578a5e8d9be3′]
जालना शहरातील महसूल कॉलनीमध्ये राहणारा श्रीकांत पांगारकर मूळचा शिवसेनेशी जोडलेला कार्यकर्ता होता. पक्ष कार्यकर्ता म्हणून ओळख असताना 2001 साली शिवसेनेने त्याला भाग्य नगर भागातून तिकीट दिलं, त्यावेळी तो या तिकिटावर निवडून आला.
यानंतर 2006 साली पुन्हा तो या भागातून शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आला. 2011 साली पक्षाशी फारसा सक्रिय नसल्याच्या कारणावरून त्याला पक्षाचं तिकीट देण्यात आलं नाही. या काळात त्याचा हिंदू जन जागृती संघटनेशी संबंध आला. यानंतर तो या संघटनेचा सक्रिय सदस्य म्हणूनच कार्यरत होता. आई, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा पांगारकरचा परिवार आहे.