काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले तर प्रणिती शिंदेंसह 6 जण कार्यकारी अध्यक्ष; पुण्यातील मोहन जोशी आणि रमेश बागवे यांची उपाध्यक्षपदी वर्णी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ऑल इंडिया काँग्रेस कमिटीनं महाराष्ट्र काँग्रेसमधील पदाधिकार्‍यांच्या नियुक्ती केल्या आहेत. गेल्या अनेक दिवसांपासुन काँग्रेसमध्ये राज्यस्तरावर मोठे फेरबदल होणार असं सांगितलं जात होतं. आज अखेर काँग्रेसच्या अध्यक्षांकडून नवीन पदाधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काँगे्रसच्या प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर आमदार प्रणिती शिंदे यांच्यासह 6 जणांची कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. काँगे्रसच्या प्रदेश उपाध्यक्षपदी 10 जणांची निवड करण्यात आली आहे. या सर्व नियुक्त्या दिल्लीतून झाल्या आहेत.

नाना पटोले – प्रदेशाध्यक्ष

कार्यकारी अध्यक्ष
1. शिवाजीराव मोघे
2. बसवराज पाटील मुरूमकर
3. मोहम्मद अरिफ नसीम खान
4. कुणाल रोहिदास पाटील
5. चंद्रकांत हंडोरे
6. प्रणिती सुशिलकुमार शिंदे

उपाध्यक्ष
1. शिरीष मधुकरराव चौधरी
2. रमेश आनंदराव बागवे (पुणे)
3. हुसेन दलवाई
4. मोहन जोशी (पुणे)
5. रणजित प्रताप कांबळे
6. कैलास कृष्णराव गोरंटयाल
7. बी.आय. नागाराळे
8. शरद अहेर
9. एम.एम. शाहिक
10.माणिक मोतीराम जगताप