Nana Patole | ‘नाना पटोलेंची जीभ छाटा अन् 1 लाख बक्षीस मिळवा’; भाजपचा आक्रमक पवित्रा

जालना : पोलीसनामा ऑनलाइन – Nana Patole | काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याविषयी खळबळजनक वक्तव्य केलं होतं. एका सभेदरम्यान बोलताना ‘मी मोदीना मारू शकतो आणि शिव्या देऊ शकतो’ असं वादग्रस्त विधान केलं होतं. त्यानंतर भाजपने (BJP) आक्रमक पवित्रा घेतला आहे. आज भाजपने पटोलेविरोधान जोरदार निदर्शने केली आहेत. यानंतर जालन्यातील (Jalna News) भाजपच्या युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष सुजित जोगस (Sujit Jogas) यांनी पटोले यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ”आता मुद्याची लढाई गुद्यावर आली आहे. ‘नाना पटोलेंची जीभ छाटा 1 लाख मिळवा” अशी घोषणाच त्यांनी केली आहे. यानंतर काँग्रेस (Congress) देखील आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात केलेल्या वादग्रस्त विधानानंतर नाना पटोले (Nana Patole) यांच्याविरोधात जालना भाजप युवा मोर्चाने (Jalna BJP) चांगलाच आक्रमक पवित्रा घेतला. जिल्हाध्यक्ष प्रा. सुजित जोगस (Sujit Jogas) यांनी तर चक्क नाना पटोलेंची जीभ छाटून आणा आणि एक लाख रुपये बक्षीस मिळवा, अशी वादग्रस्त योजनाच जाहीर केली आहे.

 

त्याचबरोबर सुजित जोगस यांनी कदीम जालना पोलीस ठाण्यात (Kadim Jalna Police Station) नाना पटोले यांच्या विरोधात तक्रारही दिली आहे. (Jalna News)

अनिल बोडेंनी दिली हात छाटण्याची धमकी –
‘नानांनी लक्षात ठेवावे शाहिस्ते खानाची नुसती बोटच छाटली होती तुझा पंजाच छाटलाच जाईल. उगीचच गमच्या मारू नको अमरावती वरून पोरं निघाले आहेत पंजा सांभाळून ठेवावा, असे वक्तव्य माजी कृषिमंत्री अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी केलं होतं. तसेच, ‘सोनियांना गांधी यांना खुष करण्यासाठी मोदींवर किती भुंकायचे याची शर्यत काँग्रेसमध्ये लागली आहे. नाना ने तर हद्दच केली आहे. मी मालकीनचा सगळ्यात प्रामानिक कुत्रा आहे म्हणून दाखविण्यासाठी भुंकण्यासोबतच चावण्याचाही धमकी दिली, असंही अनिल बोंडे म्हणाले होते. दरम्यान, नाना पटोले यांचा पंजा छाटणार अशी भाषा करणाऱ्या अनिल बोंडे यांना तात्काळ अटक करा, अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते दिलीप ऐडतकर (Dilip Aidatkar) यांनी केली आहे.

 

 

Web Title :- Nana Patole | get congress leader nana patoles tongue cut 1 lakh reward bjp leaders open threat at jalana

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Corona Updates | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 4866 नवीन रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Amruta Fadnavis | अमृता फडणवीसांचा पटोलेंवर निशाणा; म्हणाल्या – ‘सूरज को डुबाने का इरादा रखते है कुछ नन्हे पटोले’

 

Vinod Kambli-Sachin Tendulkar | माजी क्रिकेटपट्टू विनोद कांबळीनं ठोकलं अर्धशतक..! सचिनने ‘खास’ फोटो शेअर करत म्हणाला…