Nana Patole | ‘सत्तेत असूनही जे आपला पक्ष सांभाळू शकले नाहीत त्यांनी…’, चंद्रकांत खैरेंच्या दाव्यावर नाना पटोलेंचा पलटवार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे गट (Shinde Group) आणि ठाकरे गटाकडून (Thackeray Group) आरोप प्रत्यारोप सुरु झाले. सत्तासंघर्षाचा वाद न्यायालयात पोहोचला असून शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या अपात्रते संदर्भात (MLA Disqualification) न्यायालयात सुनावणी प्रलंबीत आहे. जर हे आमदार अपात्र ठरले तरी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सरकार पडणार नाही, याची तजवीज केली असल्याचा दावा ठाकरे गटाने केला आहे. काँग्रेसचे (Congress) 22 आमदार सरकारमध्ये येण्यासाठी तयार असल्याचा दावा चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी केला आहे. यावरुन राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी यावर प्रत्युत्तर दिले आहे. ज्यांना आपालच पक्ष सत्तेमध्ये असुनही सांभाळता आला नाही, त्यांनी दुसऱ्या पक्षाची काळजी करु नये, अशा शब्दात नाना पटोले (Nana Patole) यांनी पलटवार केला आहे.

चंद्रकांत खैरे यांच्या दाव्याला प्रत्युत्तर देताना नाना पटोले (Nana Patole) म्हणाले, जे आपला पक्ष सांभाळू शकले नाहीत त्यांनी दुसऱ्याच्या पक्षाबद्दल बोलण्याचं काही कारण नाही. ज्यांना आपलाच पक्ष सत्तेमध्ये असुनही सांभाळता आला नाही, त्यांनी दुसऱ्याच्या पक्षाबद्दल काळजी करण्याचं काही कारण नाही. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

काय म्हणाले चंद्रकांत खैरे?

देवेंद्र फडणवीस हुशार आहेत. शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरल्यास सरकार पडेल म्हणून त्यांनी आत्तापासूनच
काँग्रेसचे 22 आमदार तयार ठेवले आहेत. यातून ते त्यांचं मुख्यमंत्रीपद (CM) मिळवून घेतील.
कारण मुख्यमंत्रीपद त्यांना मिळालं नाही म्हणून त्यांचा चेहरा किती पडलेला असतो.
हे सगळं असताना त्यांचे डावपेच सुरु असतात, असे खैरे म्हणाले.

Web Title :-  Nana Patole | reply from congress state president nana patole on shivsena leader chandrakant khaires claim that 22 congress mlas are ready for fadnavis

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा