Nana Patole | अजित पवार मुख्यमंत्री होणार? नाना पटोले म्हणाले – ‘मोदी है तो मुमकिन है’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Nana Patole | काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते अजित पवार (Opposition Leader Ajit Pawar) यांनी मला मुख्यमंत्री (Chief Minister) व्हायला आवडेल असे वक्तव्य केले होते. यावरुन राज्यात पुन्हा एकदा राजकीय चर्चांना सुरुवात झाली होती. यातच शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) आज आहे, उद्याचे सांगता येत नसल्याचे म्हणत याला आणखीनच खतपाणी घातल्याने उलट सुलट चर्चांना उधाण आलं आहे. यासंदर्भात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष (Congress State President) नाना पटोले (Nana Patole) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

 

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांना अजित पवार मुख्यमंत्री होऊ शकतात का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना ते म्हणाले, राजकारणात (Maharashtra Political News) काहीही होऊ शकतं, कोणी कोणाचा दोस्त नसतो, की दुश्मन नसतो. मोदी (PM Narendra Modi) है तो मुमकिन है, असं पटोले म्हणाले.

 

तसेच मी काही भविष्य सांगणारा नाही. काँग्रेस पक्ष लोकशाहीला मानणारा आहे. येत्या निवडणुकीत काँग्रेसचे जास्त आमदार निवडून येतील आणि काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल असे नाना पटोले यांनी म्हटले.

 

मुंबईत होत असलेल्या वज्रमूठ सभेला (MVA Vajramuth Sabha) आजुबाजुच्या जिल्ह्यांतून लोक यावेत यासाठी काँग्रेस नियोजन करत आहे.
शरद पवार हे मोठे नेते आहेत. याआधीच्या सभांना ते आले नाहीत.
मोदी सरकार (Modi Government) आल्यावर बेरोजगारी महागाई हे पाहून मोदी विरुद्ध आहेत त्यांना सोबत घेऊन जाणं गरजेचे आहे,
अशी काँग्रेसची स्पष्ट भूमिका असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले.

 

Web Title :- Nana Patole | will ajit pawar become chief minister modi hai to mumkin hai nana patole also replied

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime News | पिसोळीत ज्येष्ठ नागरिकाचा खून, कोंढवा पोलिसांकडून तासाभरात मारेकरी गजाआड

Dr. Nivedita Bhide | ‘गोष्टी, गोष्टी,पन्नास गोष्टी !’ पुस्तक संचाचे प्रकाशन – गोष्टींमुळे भाव जागरण व्हावे, दिशा मिळावी : डॉ. निवेदिता भिडे

CM Eknath Shinde | ‘झोळी लटकवून निघून जाशील…’, उद्धव ठाकरेंच्या पंतप्रधानांवरील टीकेला मुख्यमंत्र्यांचे प्रत्युत्तर, म्हणाले… (व्हिडिओ)