नांदेड : दिवसभरात 24 पॉझिटिव्ह आढळले, ‘कोरोना’बाधितांचा आकडा 286 वर

नांदेड (माधव मेकेवाड) : पोलीसनामा ऑनलाइन  –    नांदेड शहरात आज दि.१६/०६/२०२० रोजी सायं. ०५ वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालात २४ व्यक्तींना कोरानाची बाधा झाल्याने जिल्ह्यातील ही संख्या २८६ वर पोहचली आहे. आज या चौविस बाधितांपैकी १४ पुरुष असून १० महिला आहेत.अनुक्रमे सोमेश कॉलनी येथील ३ पुरुष वय वर्ष अनुक्रमे त्यांचे वय २२,४१,५३ व १ महिला वय वर्ष २३,शिव विजय कॉलनी येथील १ पुरूष वय वर्ष ६७ व ३ महिला वय वर्ष ३,३७ व ६१,श्रीकृष्ण नगर येथील १ पुरुष वय वर्ष ६१ व १ महिला वय वर्ष २९,फरांदे नगर येथे १ पुरुष वय वर्ष ५५ ,एम जी एम परिसर येथे १ पुरुष वय वर्ष ३०,विशाल नगर येथे १ पुरुष वय वर्ष ४९,बरकतपुरा येथील १ पुरुष वय वर्ष ३६,परीमत नगर येथील १ वय वर्ष ५५,चिखलवाडी येथील १ महिला वय वर्ष ५२,दिपनगर येथील १ महिला वय वर्ष १९,तसेच मुखेड ३ पुरुष वय वर्ष अनुक्रमे ११,३०,५५ व तसेच ३ महिला वय वर्ष अनुक्रमे ३८,५०,६५ आणि सेलू जि.परभणी येथील एक पुरुष वय वर्ष ३८ यांचा समावेश आहे.

आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या १३ झाली आहे. जिल्ह्यात बाधित व्यक्तींपैकी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी,नांदेड येथे १४ बाधित व्यक्तींवर, एनआरआय यात्री निवास कोविड केअर सेंटर येथे ५२, मुखेड ग्रामीण रुग्णालय कोविड केअर सेंटर १३ बाधित व्यक्तीवर तज्ज्ञ डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली उपचार सुरु आहेत. ०५ बाधित व्यक्ती औरंगाबाद येथे संदर्भीत करण्यात आला आहे. बुधवार १६ जून २०२० रोजी १६७ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यांचा अहवाल उद्या सायंकाळी पर्यंत प्राप्त होतील.

जिल्ह्याची कोरोना विषयी संक्षीप्त माहिती पुढील प्रमाणे आहे.

सर्वेक्षण- १ लाख ४५ हजार ४६४,
घेतलेले स्वॅब ५ हजार ३९७,
निगेटिव्ह स्वॅब ४ हजार ६३०,
आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या २४,
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती २८६,
स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या २२०,
स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-८६,
मृत्यू संख्या- १३,
रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- १८०,
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती ९३,

स्वॅब तपासणी चालू व्यक्तींची १६ ७ एवढी संख्या आहे.

कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन नांदेडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे. तसेच सर्व जनतेने आपल्या मोबाईलवर “आरोग्य सेतू ॲप” डाऊनलोड करुन घ्यावे जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल असे डॉ. भोसीकर यांनी स्पष्ट करुन प्रशासनास जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.