Nandurbar ACB Trap | 8 हजार रुपयांची लाच घेताना पोलीस कर्मचारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

नंदुरबार : पोलीसनामा ऑनलाइन – मारहाण व वादाच्या प्रकरणात गुन्हा दाखल करु न देण्याच्या मोबदल्यात 8 हजार रुपये लाच घेताना (Accepting Bribe) नंदुरबार जिल्ह्यातील विसरवाडी पोलीस ठाण्यातील पोलीस शिपायाला नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Nandurbar ACB Trap) रंगेहात पकडले. दारासिंग जोरदार पावरा Darasingh Jordar Pawara (वय-35) असे पोलीस शिपायाचे नाव आहे. नंदुरबार एसीबीने (Nandurbar ACB Trap) ही कारवाई बुधवारी (दि.18) केली.

 

याबाबत नवापुर तालुक्यातील कुंकरान येथील 42 वर्षाच्या पथकाने नंदुरबार एसीबीकडे (Nandurbar ACB Trap) तक्रार केली आहे. तक्रारदार व इतरांमध्ये झालेल्या मारहाण व वादाचे प्रकरणात गुन्हा दाखल न होवू देण्याचे मोबदल्यात दारासिंग पावरा यांनी तक्रारदार यांचेकडे दहा हजार रुपये लाचेची मागणी केली. तडजोडी अंती 8 हजार रुपये देण्याचे ठरले. तक्रारदार यांनी याबाबत नंदुरबार एसीबीकडे तक्रार केली.

 

पथकाने पंचासमक्ष पडताळणी केली असता, दारासिंग पावरा यांनी दहा हजार रुपये लाचेची मागणी करुन 8 हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. पथकाने सापळा रचून तक्रारदार यांच्याकडून लाचेची रक्कम स्वीकारताना पावरा यांना रंगेहात पकडण्यात आले. दारासिंग पावरा यांच्या विरुद्ध विसरवाडी पोलीस स्टेशन मध्ये (Visarwadi Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

 

ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर (SP Sharmistha Gharge-Walawalkar),
अपर पोलीस अधीक्षक नारायण न्याहळदे (Addl SP Narayan Nyahalde) पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार (DySP Narendra Pawar)
यांच्या मार्गदर्शनाखाली एसीबी नंदुबारचे पोलिस उप अधीक्षक राकेश चौधरी (DySP Rakesh Chaudhary),
पोलीस निरीक्षक माधवी वाघ (Police Inspector Madhavi Wagh), पोलीस अंमलदार विलास पाटील,
ज्योती पाटील, मनोज अहिरे, अमोल मराठे यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Nandurbar ACB Trap | Police personnel caught in anti-corruption net while taking bribe of 8 thousand rupees

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune PMC News | कैलास स्मशानभूमीतील विद्युत दाहिनी दहा दिवस बंद राहणार

Nashik Graduate Constituency | आमदार कपिल पाटील यांचा सत्यजीत तांबे यांना पाठिंबा

Pune Crime News | गैरव्यवहार प्रकरणात कारागृहात असणारे मंगलदास बांदल 21 महिन्यानंतर बाहेर येणार, उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर