Narayan Rane | अधिश बंगल्याबाबत नारायण राणे यांना मोठा दिलासा, जाणून घ्या नेमकं काय झालं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Narayan Rane | केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा मुंबईत (Mumbai) जुहूमध्ये (Juhu) एक बंगला असुन त्यामध्ये अनधिकृत बांधकाम (Unauthorized Construction) झाल्याची तक्रार राणेंविरोधात करण्यात आली होती. राणेंना 15 दिवसांची मुदत देण्यात आली होती. अशातच नारायण राणे यांना मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) मोठा दिलासा दिला आहे. (Narayan Rane)

 

नारायण राणेंनी मुंबई महापालिकेने (BMC) पाठवलेल्या कारवाईच्या आदेशाविरोधात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज सुनावणी पार पडली, यामध्ये नव्याने कारवाई करण्याची मुभा न्यायालयाने राज्य सरकारला दिली आहे. यावेळी राज्य सरकारकजून महाधिवक्ता कुंभकोणी यांनी उच्च न्यायालयात (Bombay High Court) कारवाईचे आदेश मागे घेत असल्याची माहिती दिली. (Narayan Rane)

 

नक्की काय होतं प्रकरणं?
मुंबईतील जुहू येथे नारायण राणेंचा ‘अधिश’ (Adhish) नावाचा बंगला आहे. या बंगल्यामध्ये अनधिकृत बांधकाम झाल्याच्या अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यानंतर राणेंच्या बंगल्याची दोनदा पाहणी करण्यात आली. त्यानंतर राणेंच्या बंगल्यासंदर्भात महापालिकेने नोटीस पाठवली होती. माहिती अधिकारी (Information Officer) संतोष दौंडकर (Santosh Daundkar) यांनी ही तक्रार केली होती.

 

दरम्यान, कोस्टर रेग्युलेशन झोन (Coastal Regulations Zone) नियमांचे उल्लंघन करुन हा बंगला बांधण्यात केल्याची तक्रार त्यांनी केली होती. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राणेंना ही नोटीस पाठवण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र आता न्यायालयानेच नव्याने कारवाई करण्याची मुभा राज्य सरकारला दिली आहे.

 

 

Web Title :- Narayan Rane | action order taken back against narayan rane adhish bungalow

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

LIC Jeevan Saral Pension | ‘या’ योजनेत करा गुंतवणूक अन् निवृत्तीनंतर मिळवा ‘इतकी’ पेन्शन; जाणून घ्या स्कीम

 

Pune Dhanori Encroachment Operation | पुण्यात अतिक्रमण कारवाई दरम्यान तुफान ‘राडा’ ! अधिकाऱ्याला बेदम मारहाण तर जेसीबीवर दगडफेक (Video)

 

Anti Corruption Bureau (ACB) Pune | पुणे मनपाच्या सहाय्यक अभियंता व कनिष्ठ अभियंत्याला पैसे द्यावे लागतात ! अ‍ॅन्टी करप्शननं महापालिकेच्या कॉन्ट्रॅक्टरला लाच घेताना रंगेहाथ पकडलं

 

Shehnaaz Kaur Gill Magazine Photoshoot | सोफ्यावर बसून शहनाज कौर गिल झाली अधिकच बोल्ड, केलं मॅगझीनसाठी सिझलिंग फोटोशूट..