Narayan Rane । ‘चला संजय पाहू कोण कोणाला शिवथाळी देतं, नारायण राणेंचा राऊतांना इशारा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Narayan Rane । ‘अयोध्ये (Ayodhya) तील राम मंदिरा (Ram Mandir) च्या ट्रस्ट(Trust) ने जमीन घोटाळा प्रकरणावरून शिवसेना (shiv sena) आणि भाजपामधील (BJP) वाद टोकाला पोहचले आहेत. या प्रकरणावरूनच मुंबईत दोन दिवसापूर्वी शिवसेना भवनासमोर (shivsena bhavan) राम मंदिराच्या मुद्यावरून शिवसेना (shiv sena) आणि भारतीय जनता पार्टी या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला होता. यानंतर या झालेल्या घटनेवरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी प्रतीक्रिया दिली. ‘काल प्रसाद दिला, आता शिवभोजन थाळी द्यायला लावू नका’ असे भाष्य राऊत यांनी केले होते. त्यानंतर भाजपचे खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी संजय राऊत (sanjay raut) यांच्यावर निशाणा साधला आहे. (Narayan Rane | bjp mp leader narayan rane slam sanjay raut and warn shiv sena)

काय म्हणाले नारायण राणे ?

नारायण राणे (narayan rane) म्हणाले की, संजय राऊत (sanjay raut) यांनी दादागिरीची भाषा करु नये. प्रसाद वाटत असाल, तर प्रसादाची परतफेड कशी द्यायची हे आम्ही शिकलो आहेत. शिवसेनेत (shiv sena) असतानाच हे शिकलो आहे असं नारायण राणे (narayan rane) यांनी म्हटलं आहे. स्वत:ला सांभाळा नाहीतर तुमच्या वाट्याला शिवथाळी कधी येईल ते समजणार नाही. आजची शिवसेना (shiv sena) माननीय बाळासाहेबांची शिवसेना नाही. ही आदित्य, उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे, असं देखील त्यांनी म्हटलं.

पूढे नारायण राणे म्हणाले, संजय राऊतांना (sanjay raut) शिवसेना भवन आणि शिवसेनेचा इतिहास सांगण्याचा काही अधिकार नाही. तुमची वायफळ बडबड लोक ऐकत नाहीत, चेष्टा करतात. संजय राऊत (sanjay raut) कधी कोणाला थप्पड मारु शकले नाहीत, ते धमक्या देतात आश्चर्य वाटतं, असं नारायण राणे (narayan rane) म्हणाले, ‘चला संजय पाहू कोण कोणाला शिवथाळी देतं’ असा थेट इशारा देखील नारायण राणेंनी (narayan rane) दिला आहे. तसेच, मी भाजपाचा सदस्य आहे. महिलांवर ज्यांनी अत्याचार केले, त्यांचे हात-पाय विसरणार नाही. पुढे शिवथाली कोण कोणाला देत ते पाहू. ही भाषा तुमच्या तोंडी शोभते का? तुम्ही राष्ट्रवादीत आहात की शिवसेनेत? शिवसेनेचा पुळका स्वार्थापोटी आहे, अशी टीका देखील राणेंनी (narayan rane) राऊत यांच्यावर केलीय.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Web Titel : Narayan Rane | bjp mp leader narayan rane slam sanjay raut and warn shiv sena

हे देखील वाचा

Pan Card and Aadhaar Card | 30 जूनपूर्वी ‘हे’ काम करणे अनिवार्य अन्यथा बसेल 1 हजाराचा फटका

Ajit Pawar | ‘…तर पुणे, जिल्ह्यातून बाहेर गेलेल्यांना परतल्यास 15 दिवस क्वारंटाईन करावं लागेल’ – उपमुख्यमंत्री (व्हिडीओ)

pune commissioner amitabh gupta | पुण्यात जबरी चोर्‍या करणार्‍यांवर मोक्का अंतर्गत कारवाई

Ajit Pawar । …तर पुण्यात निर्बंध वाढवण्याची वेळ येईल; उपमुख्यमंत्री अजित पवार