Narayan Rane | ‘नोटां’ची मत भाजपची, ऋतुजा लटकेंच्या आरोपाला नारायण राणेंचे प्रत्युत्तर; म्हणाले- ‘आधी प्रमाणपत्र हातात घ्यावं, मगच…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत (Andheri Bypoll Result ) शिवसेना ठाकरे गटाच्या (Thackeray Group) उमेदवार ऋतुजा लटके (Rutuja Latke) या विजयी झाल्या आहेत. विजयानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बोलताना नोटाला (NOTA) मिळालेल्या मतांवर प्रतिक्रिया देताना भाजपची (BJP) मतं ही नोटाला गेली, असे म्हटले होते. यावरुन केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane ) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आधी त्यांनी विजयी झाल्याचे प्रमाणपत्र हातात घ्यावे, मगच टीका करावी. कुठं काय बोलावं हे त्यांना अवगत नसल्याची टीका नारायण राणे (Narayan Rane) यांनी केली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

आधी त्यांनी विजयाचे प्रमाणपत्र हातात घ्यावं. मगच टीका करावी. कुठ काय बोलावं हे त्यांना अवगत नाही. भाजपची मतं कोणाला पडली, यावर बोलायचे झाले तर आम्ही त्यांना यापूर्वीच पाठिंबा दिला आहे. आम्ही लटकवत नाही. आमचा निर्णय पक्का असतो, असे प्रत्युत्तर नारायण राणे (Narayan Rane) यांनी ऋतुजा लटके यांना दिले आहे.

यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मध्यावधी निवडणुकीच्या (Mid-Term Elections) वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना टीका केली. मध्यावधी निवडणुका का होतील? कारण काय आहे? नैसर्गिक आपत्ती आहे की सरकार पडलं आहे? मध्यावधी निवडणुका घ्यायचं नेमकं कारण काय आहे? उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री पद गेलं म्हणून मध्यावधी निवडणुका घ्यायच्या का? असं होत नाही. घरबसल्या बोलायला काय जातं. त्यांनी घराच्या बाहेर येऊन बोलावं, असे राणे म्हणाले.

Web Title :-  Narayan Rane | narayan rane replied to rutuja latke nota statement in andheri bypoll result

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

T20 World Cup | ठरलं ! सेमी फायनलमध्ये ‘या’ टीमशी होणार भारताचा सामना

Andheri Bypoll Result | अंधेरीत भगवा फडकला, ऋतुजा लटकेंच्या विजयानंतर उद्धव ठाकरेंनी साधला भाजपसह शिंदे गटावर निशाणा