Narayan Rane | भुजबळांनंतर आता, अडीच वर्ष उद्धव ठाकरेंना जेलमध्ये काढायचीत, आम्ही सोडणार नाही, राणेंची थेट धमकी, पैसे बुडवल्याचा आरोप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दसरा मेळाव्याच्या (Dasra Melava 2022) भाषणात नारायण राणे (Narayan Rane) यांच्यावर केलेली टीका त्यांच्या जिव्हारी लागली आहे. सध्या भाजपाने (BJP) एक ’इव्हेन्ट’ युग देशात आणले आहे. त्यात जन्मापासून मयतापर्यंत उत्सव किंवा इव्हेन्टच केले जातात. त्यातलाच एक भाजप पुरस्कृत ’इव्हेन्ट’ दसर्‍यानिमित्ताने बीकेसी मैदानावर (BKC Ground) झाला. तेच आणि तेच रडगाणे याशिवाय तिथे दुसरे काय होते? नारायण राणे (Narayan Rane) यांनीही अचंबित होऊन तोंडात बोटे घालावीत असे खोटे, दळभद्री आरोप आमच्यावर केले गेले, असे वक्तव्य ठाकरे यांनी केले होते. यावर राणे यांनी आता उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप आज केले आहेत. तसेच जेलमध्ये जावे लागेल असा इशारा दिला आहे.

 

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी म्हटले की, कोरोनाचा उद्रेक झालेल्या 2020-21 आणि 2021-22 या वर्षात संपूर्ण देशात उद्योगधंदे बंद पडलेले असताना शिवसेनेचं (Shivsena) मुखपत्र असलेल्या ’सामना’नं 42 कोटी रुपयांची उलाढाल केली आणि साडे अकरा कोटी रुपयांचा नफा कमावला. देशातील सर्व वृत्तपत्र संस्था डबघाईला निघाल्या आणि माध्यम समूहांना कोरोना काळात मोठा फटका बसला पण सामनानं नफा कमावला यामागचं गुपीत काय? इकडचे ’खोके’ ’सामना’मध्ये दाखवून व्हाइट करण्याचं काम उद्धव ठाकरे यांनी केलं.

 

राणे (Narayan Rane) म्हणाले, कोरोना काळात ’सामना’नं कमावलेले 42 कोटी रुपये आले कुठून याचं उत्तर उद्धव ठाकरे यांनी द्यावं. राजमुद्रा प्रिटिंग प्रेसच्या गौरी भिडे नावाच्या महिला आहेत त्यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली. प्रबोधन प्रकाशन प्रायव्हेट लिमिटेड आणि उद्धव ठाकरे यांचे उत्पन्नाचे स्त्रोत काय? याची विचारणा केली. सामनाचं उत्पन्न काय? आणि उद्धव ठाकरेंचं उत्पन्न काय? हे त्यांनी सांगावं. त्यानंतरच खोक्याचे आरोप करावे.

 

राणे म्हणाले, भुजबळ दोन-अडीच वर्ष जेलमध्ये राहिले. भुजबळांचा जो सीए आहे. त्याच सीएनं ’मातोश्री’चेही पैसे व्हाइट केले. भुजबळांनी अडीच वर्ष आत काढली आता उर्वरित अडीच वर्ष उद्धव ठाकरेंना जेलमध्ये काढायची आहेत. आम्ही सोडणार नाही. तुम्ही लोकांचे पैसे बुडवले आहेत.

 

नारायण राणे पुढे म्हणाले, उद्धव ठाकरे नेमकं करतात काय? काहीही न करता ते संपत्तीचे मालक कसे झाले? उद्धव ठाकरेंनी कधी एकातरी शिवसैनिकाला मदत केली आहे का? एकनाथ शिंदे आणि या नारायण राणेनं शिवसेना तळागळापर्यंत पोहोचवली. उद्धव ठाकरेंचं पक्ष वाढीसाठी नेमकं योगदान काय? ते नुसते आयत्या बिळावर नागोबा आहेत.

 

राणे यांनी म्हटले की, उद्धव ठाकरेंच्या प्रॉपर्टीबद्दल गौरी भिडे बोलल्याच आहेत.
चतुर्वेदी नावाच्या सीएनं भुजबळांप्रमाणेच ठाकरेंचेही ब्लॅकचे पैसे व्हाइट केले आहेत.
यासंबंधीचे सगळी कागदपत्र दिल्लीला योग्य जागी पोहोचवली आहेत. त्यामुळे कुणाचीही सुटका होणार नाही.
पाटणकरांची पण नाही आणि यांचीही सुटका नाही.
दसर्‍याच्या दिवशी उद्धव ठाकरेंनी शिवाजी पार्कवर फक्त तमाशा केला. साहेबांनी जगात नाव केलं. पण या माणसाची अजिबात पात्रता नाही.

 

Web Title :- Narayan Rane | uddhav thackeray makes black money white from saamana allegation of narayan rane

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Political Crisis | निवडणूक आयोगाने शिवसेनेची ‘ती’ मागणी फेटाळली, दिल्लीत घडामोडींना वेग

Deepak Kesarkar | टीईटी घोटाळ्यातील दोषी शिक्षकांसंदर्भात दीपक केसरकर यांचे मोठं वक्तव्य, म्हणाले…

Dombivli Crime | बँक कर्मचाऱ्यानेच केली बँकेत चोरी, अखेर शेवटी आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश