Maharashtra Political Crisis | निवडणूक आयोगाने शिवसेनेची ‘ती’ मागणी फेटाळली, दिल्लीत घडामोडींना वेग

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Maharashtra Political Crisis| महाराष्ट्राच्या राजकारणासाठी दिल्लीतील घडामोडींना वेग आला आहे. शिवसेनेत (Shivsena) मोठी फूट पडल्यानंतर पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Party Chief Uddhav Thackeray) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या गटाने पक्षाचे चिन्ह (Party Symbol) आणि हक्कावरून संघर्ष सुरु आहे. त्यांच्या या संघर्षावर (Maharashtra Political Crisis) निवडणूक आयोगात सुनावणी सुरु आहे. निवडणूक आयोगात (Central Election Commission) पक्षाच्या चिन्हावरुन शुक्रवारी महत्त्वाची सुनावणी झाली. या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाने (Shinde Group) निवडणूक आयोगाकडे पक्ष सदस्यत्वाचे तब्बल 7 लाख प्रतिज्ञापत्र (Affidavit) सादर केले आहेत. उद्धव ठाकरे गटाने अडीच लाख प्रतिज्ञापत्र सादर केले आहेत.

 

निवडणूक आयोगाकडे कागदपत्र सादर करण्यासाठी शिंदे गटाने धावाधाव केली. त्यानंतर उद्धव ठाकरे गटाकडूनही कागदपत्रे सादर करण्यासाठी धावाधाव सुरु आहे. ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे कागदपत्रे सादर करण्यासाठी चार आठवड्यांचा वेळ मागितला. निवडणूक आयोगाने मात्र ठाकरे गटला उद्या दुपारी दोन वाजेपर्यंतचा वेळ दिला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणासाठी (Maharashtra Political Crisis) या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या घडामोडी आहेत.

केंद्रीय निवडणूक आयोगाकडे शिंदे गटाने सकाळी सर्व कागदपत्र दिली. तर उद्धव ठाकरे यांच्या वतीने दुपारी ज्येष्ठ वकील देवदत्त कामत (Senior Advocate Devdutt Kamat) यांच्या माध्यमातून कागदपत्र सादर केली. दोन्ही गटांसाठी ही लढाई ‘करो या मरो’ अशी आहे. शिवसेनेची बाजू मांडण्यासाठी आज शिवसेनेचे नेते अनिल देसाई (Anil Desai) हे दिल्ली पोहचले. पक्षचिन्हावर आज निवडणूक आयोग अंतिम सुनावणी घेईल अशी शक्यता होती. पण शिवसेनेकडून आणखी मुदतवाढ मागण्यात आल्याने आयोगाने उद्या दुपारी दोन वाजेपर्यंतचा वेळ शिवसेनेला दिला. त्यामुळे उद्या दुपारी दोन वाजेपर्यंत शिवसेनेला आपली बाजू मांडता येणार आहे.

 

निवडणूक आयागेने ठाकरे गटाला उद्यापर्यंतचा अल्टीमेटम दिला आहे.
यामुळे ठाकरे गटाकडे काही तास शिल्लक राहिले आहेत.
उद्या दुपारपर्यंत जर सर्व संबंधित कागदपत्रे सादर केली नाहीत, तर निवडणूक आयोग पुढील कार्यवाही करेल.
केंद्रीय निवडणूक आयोगाने 4 ऑक्टोबरला शिवसेने संबंधित सर्व कागदपत्रे मागतली.
मात्र आतापर्य़ंत ठाकरे गटाकडून केवळ कार्यकारिणीच्या सदस्यांची नावे दिली आहेत. इतर नोंदणी पत्र दिलेली नाहीत.

 

Web Title :- Maharashtra Political Crisis | election commission reject request of shivsena to demand time for submit documents

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Deepak Kesarkar | टीईटी घोटाळ्यातील दोषी शिक्षकांसंदर्भात दीपक केसरकर यांचे मोठं वक्तव्य, म्हणाले…

Ahmednagar Crime | प्रेम प्रकरणात अडथळा ठरणाऱ्या सख्या बहिणाचा खून करुन रचला आत्महत्येचा बनाव, आरोपी बहिणीवर FIR

Dombivli Crime | बँक कर्मचाऱ्यानेच केली बँकेत चोरी, अखेर शेवटी आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश