नारायण राणेंच्या पक्षाला मिळाले ‘हे’ अनोखे निवडणूक चिन्ह 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन  – खासदार नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाला लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी ‘बादली’ हे अनोखे चिन्ह निवडणूक आयोगाकडून मिळाले आहे. याच चिन्हाची आज शुक्रवारी नारायण राणे सायंकाळी ५ वाजता बांद्रा पश्चिम येथील रंगशारदा येथे ‘मुंबईकर कोकणवासीयांच्या मेळाव्यात’ राणे घोषणा करणार आहेत.

नारायण राणे यांनी पत्रकाराशी संवाद साधताना सांगितले कि, आमचा पक्ष येत्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका संपूर्ण महाराष्ट्रात लढवणार आहे. संपूर्ण शक्ती पणाला लावून आम्ही या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. आम्हाला आमच्या हक्काचे चिन्ह निवडणूक आयोगाकडून मिळाले आहे. त्याची अधिकृत घोषणा आम्ही करणार आहोत.

कोकणवासीयांच्या मेळाव्याला उपस्थित राहून नारायण राणे या चिन्हाची आज घोषणा करणार आहेत. यावेळी त्यांचे पुत्र माजी खासदार डॉ. निलेश राणे आणि आमदार नितेश राणे उपस्थित राहणार आहेत. त्याचप्रमाणे नारायण राणे यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समर्थक देखील मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याचे समजते आहे.