मोदीजी तुम्ही बायकोची काळजी घेतली नाही देशाची काय घेणार ? : ममता बॅनर्जी

कोलकाता : वृत्तसंस्था – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि भाजप नेत्यांमध्ये शाब्दिक धुमश्चक्री दररोज सुरूच आहे. भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या कोलकात्यातील रॅलीत झालेल्या राड्यानंतर आणखीनच भर पडली आहे. त्यात आता निवडणूक आयोगाने प्रचार एक दिवस आगोदरच बंद करण्याचा निर्णय घेतल्याने ममता बॅनर्जी यांनी पत्रकार परिषद घेऊन जोरदार टीकास्त्र सोडले. यावेळी त्यांनी भाजप, नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यावर जोरदार टीका केली.

तुम्ही तुमच्या बायकोची काळजी घेतली नाही तर देशाची काय घेणार ? अशी खाजगी पातळीवरची टीका त्यांनी मोदींवर केली. प्रचार एक दिवस आगोदरच बंद करण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयावर टीका केली. पुढे बोलताना त्या म्हणाल्या कि, भाजपने बाहेरून गुंड आणून तोडफोड आणि जाळपोळ केली. या हिंसाचाराला भाजप जबाबदार असल्याचे देखील त्यांनी म्हटले.
दरम्यान, काल पत्रकार परिषद घेत भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी ममता बॅनर्जींवर जोरदार टीका करताना या हिंसाचाराला ममतादीदीच जबाबदार असल्याचे म्हटले होते. निवडणुकीत पराभव होत असल्यानेच त्यांचा जळफळाट होत असल्याचे देखील शहा यांनी म्हटले होते.

Loading...
You might also like