Nashik ACB Trap | बक्षीस म्हणून 10 हजार रुपये लाच घेणारा पोलीस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अदखलपात्र गुन्ह्यात मदत केल्याच्या मोबदल्यात बक्षीस म्हणून 10 हजार रुपये लाच घेताना (Accepting Bribe) नाशिक ग्रामीण पोलीस (Nashik Rural Police) दलातील पोलीस नाईक नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Nashik ACB Trap) सापळा रचून रंगेहात पकडले. रविराज प्रकाश जगताप Raviraj Prakash Jagtap (वय 37) असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या पोलीस नाईकचे नाव आहे. नाशिक एसीबीच्या पथकाने (Nashik ACB Trap) ही कारवाई शनिवारी (दि.10) केली.

 

याबाबत नाशिक येथील 24 वर्षीय व्यक्तीने नाशिक एसीबीकडे (Nashik ACB Trap) शुक्रवारी (दि.9) तक्रार केली. पोलीस नाईक रविराज जगताप हे घोटी पोलीस ठाण्यात (Ghoti Police Station) पोलीस नाईक म्हणून कार्यरत आहेत. तक्रारदार यांच्यावर व त्यांच्या नातेवाइकाविरुद्ध घोटी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा (Indictable Offence) दाखल आहे. या गुन्ह्यात मदत केल्याच्या व यापूर्वी वेळोवेळी मदत केल्याच्या मोबदल्यात बक्षीस म्हणून 10 हजार रुपये लाच पोलीस नाईक जगताप यांनी मागितली. तक्रारदार यांनी याबाबत नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.

नाशिक एसीबीच्या पथकाने पंचासमक्ष पडताळणी केली असता, पोलीस नाईक रविराज जगताप
यांनी तक्रारदार यांच्याकडे गुन्ह्यात मदत केल्याच्या मोबदल्यात बक्षीस म्हणून 10 हजार रुपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
शनिवारी सापळा रचण्यात आला. तक्रारदार यांच्याकडून दहा हजार रुपये लाच घेताना रविराज जगताप यांना रंगेहात पकडण्यात आले.

 

ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर (SP Sharmistha Gharge-Walawalkar),
अपर पोलीस अधीक्षक नारायण न्याहळदे (Addl SP Narayan Nyahalde),
पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार (DySP Narendra Pawar) यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलीस निरीक्षक अनिल बागुल (Police Inspector Anil Bagul), पोलीस नाईक अजय गरुड,
किरण अहिरराव, प्रकाश महाजन,चालक पोलीस हवालदार संतोष गांगुर्डे यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Nashik ACB Trap | A policeman who took a bribe of 10 thousand rupees as a reward is in the net of anti-corruption

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Lonavala Local | कामशेत स्थानकाच्या कामामुळे पुणे लोणावळा मार्गावरील अनेक लोकल रद्द

7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या खात्यात येणार ९५,०००!; मोदी सरकारची नववर्षातील भेट

Pune Crime | पुण्यातील अट्टल गुन्हेगार कोल्हापूर कारागृहात स्थानबद्ध; MPDA कायद्यान्वये CP अमिताभ गुप्तांची 89 जणांवर कारवाई