Nashik Accident | नाशिकमध्ये आणखी एका प्रवासी बसला आग, 24 तासांत दुसरी घटना

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – Nashik Accident | औरंगाबाद रोडवरील खासगी बसला लागलेल्या आगीची (Bus Fire) घटना ताजी असतानाच वणी येथे पुन्हा द बर्निंग बसचा थररा पहायला मिळाला. सप्तशृंगी गडाकडे (Shree Saptshrungi Gad Vani) जाणारी राज्य परिवहन महामंडळाची (State Transport Corporation) लालपरी बसने (ST Bus) अचानक पेट घेतला. काही कळण्याच्या आतच बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. सुदैवाने या बसमधील (Nashik Accident) सर्व प्रवासी भाविक सुखरुप असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

 

आज दुपारी नाशिकच्या (Nashik Accident) वणी गडावर ही घटना घडली. नांदुरीहुन वणी गडावर ही बस येत होती. गडाकडे येत असताना अचानक बसला आग लागली. धावत्या बसने पेट घेतल्यामुळे एकच खळबळ उडाली. बसमधील सर्व प्रवाशांनी लगेच बसमधून खाली उड्या टाकल्या. त्यामुळे बसमधील सर्व प्रवाशी सुखरुप बचावले आहेत. स्थानिकांनी धाव घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या (Fire Brigade) जवानांनी घटनास्थळी धाव घेतली.

 

दरम्यान, आज पहाटे खासगी ट्रॅव्हल्सच्या बसला आग लागली. आरटीओ आणि पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला आहे. बसमध्ये ओव्हरलोड प्रवासी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रवासी बस डिझेल टँकरवर आदळल्याने स्फोट होऊन बसला आग लागल्याची माहिती समोर आली आहे.

 

नाशिक-नांदूरनाका येथे खासगी बसच्या भीषण अपघातात 12 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.
या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दु:ख व्यक्त केले आहे.
या दुर्दैवी घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपये मदत शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे.

 

Web Title :- Nashik Accident | another bus catches fire in st bus running on vani gad nashik Bus Accident news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | कारागृहातून बाहेर आला आणि पुन्हा ‘आत’ गेला ! तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी सराईत पुन्हा जेरबंद

Pakistan Vs India | पाकिस्तानविरुद्धचा सामना गमावून देखील भारत अव्वल स्थानी कायम

Pune Crime | ब्रेकअप झाल्यावर तिला धडा शिकवण्यासाठी युट्युबवरून चोरी करायला शिकला; 14 लाखांवर मारला डल्ला