Nashik Crime | नाशिक पुन्हा हादरलं! जुन्या भांडणातून तरुणाचा निर्घृण खून, 24 तासात दोन घटना

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – Nashik Crime | नाशिकमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असून गेल्या 24 तासात दोन खुनाच्या (Murder) घटना घडल्या आहेत. या घटनांमुळे नाशिक शहर हादरुन गेले आहे. जुन्या भांडणाचा राग मनात धरुन एकाचा निर्घृण खून करण्यात आला. ही घटना ताजी असतानाच नाशिक शहरात (Nashik Crime) दुसरी खुनाची घटना घडली आहे. त्यामुळे नाशिक शहरात कायदा व सुव्यवस्थेचा (Law and Order) प्रश्न ऐरणीवर आला आहे.

नाशिक शहरात (Nashik Crime) एकाच दिवशी दोन खुनाच्या घटना घडल्या आहेत. मंगळवारी दुपारी वडिलांनी मुलीचा गळा दाबून खून केल्याने शहरात खळबळ उडाली होती. त्यानंतर सातपूर परिसरातील गोरक्षनाथ रोड, काश्मीरे मळा परिसरात रात्री 11 ते 12 च्या दरम्यान दोघांमध्ये जुन्या भांडणाची कुरापत काढून त्यांच्यात बाचाबाची झाली. त्याचे रुपांतर हाणामारीत होऊन त्यात एकाकडून दुसऱ्याच्या डोक्यात रॉड मारला. यामध्ये गंभीर जखमी त्याचा जागीच मृत्यू झाला. संतोष जयस्वाल (वय-30 रा. काश्मिरे चाळ, मुळगाव आझमगड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त सोहेल शेख (ACP Sohail Shaikh),
सातपूर पोलीस ठाण्याचे (Satpur Police Station) वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण
(Senior Police Inspector Mahendra Chavan), पोलीस निरीक्षक सतीश घोटेकर
(Police Inspector Satish Ghotekar), गुन्हे शाखेचे (Crime Branch) मोहिते,
डी.के.पवार यांच्यासह पोलिसांची पथके घटनास्थळी दाखल झाली. दरम्यान, संतोषचा मृत्यू झाल्याचे
समजताच आरोपी घटनास्थळावरुन फरार झाले आहेत. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
मयत जयस्वाल हा गॅरेजमध्ये काम करत होता. त्याने फेसबुकवर फोटो पोस्ट केल्यानंतर आरोपीने हसल्याची
कमेंट केली होती. यावरून दोघांचे वाद असल्याचे समजते. पुढील तपास सातपूर पोलीस करीत आहेत.

Web Title :- Nashik Crime | nashik satpur an old argue ended up finished a young man

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Fire News | मंगळवार पेठेतील जुन्या बाजारातील दुकानांना आग; आगीत १० दुकाने भस्मसात

Pune District Planning Committee | पुणे जिल्हा नियोजन समितीवर सदस्य नियुक्त; 20 जणांचा समावेश

Shehnaaz Kaur Gill | अभिनेत्री शहनाज गिलच्या विंटर लूकने चाहते थक्क; शेअर केले खास लूकमधील फोटो