Nashik Crime News | आरोपीकडून दारूच्या नशेत लाकडी दांडक्याने पत्नीची हत्या

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन – Nashik Crime News | नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये दारूच्या नशेत पतीने लाकडी दांडक्याने केलेल्या मारहाणीत पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे. पती-पत्नी म्हटले कि छोटे मोठे वाद आलेच पण कधी कधी हे वाद एवढ्या विकोपाला जातात आणि अशा घटना घडत असतात. गंगापूर परिसरातील शिवाजीनगर पाझर तलावाजवळील साथी आसरा कॉलनीत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. (Nashik Crime News)

 

काय आहे नेमके प्रकरण?
मीराबाई पिनू पवार (40) असे मृत पत्नीचे नाव आहे तर पिनू सोमनाथ पवार (44) असे आरोपी पतीचे नाव आहे. या घटनेत आरोपी पिनू सोमनाथ पवार यांनी दारूच्या नशेत पत्नी मीराबाई पिनू पवार यांना दांडक्याने मारहाण केली. या मारहाणीत मिराबाई यांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर पतीने पत्नी काम करताना खाली पडली, असा बनाव रचला. मात्र डॉक्टरांनी शवविच्छेदन केले असता हा खून असल्याचे उघड झाले. यानंतर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून संशयित आरोपी पती पिनू पवार याला अटक केली आहे. (Nashik Crime News)

 

अशाप्रकारे झाला खुलासा
पिनू पवार आणि मीराबाई पवार हे त्यांचा 12 वर्षीय मुलगा विकास याच्यासह गंगापूर परिसरातील साथी आसरा परिसरात राहत होते. हे दोघेजण वीटभट्टीवर मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. या दोघांना तीन मुली असून, त्यातील एक मुलगी हे दाम्पत्य राहत असलेल्या परिसरात राहत होती. यादरम्यान रात्री बाहेरून आलेल्या विकास या मुलाने बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या आईला उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र आई उठत नाही म्हणून तो जवळच राहत असलेल्या बहिणीच्या घरी गेला व त्याने बहिणीला व तिच्या पतीला घरी बोलावून आणले. यानंतर मीराबाई यांचे जावई राहुल मोरे यांनी परिसरातील नागरिकांच्या मदतीने बेशुद्ध असलेल्या मीराबाई पवार यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. यावेळी डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.

यानंतर मुलगा विकास याने या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात आपल्या आरोपी बापाविरोधात तक्रार दाखल केली.
यानंतर पोलिसांनी मुलाने दिलेल्या तक्रारीवरून संशयित पती पिनू पवार याच्याविरोधात कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल
करून त्याला अटक केली. गंगापूर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

 

Web Title :- Nashik Crime News | mystery of the death case is solved a 12 year old son has revealed that his mother was beaten to death by father

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

WPL Title Sponsor | IPL पाठोपाठ WPLला मिळाला ‘हा’ टायटल स्पॉन्सर; बीसीआयसोबत केला 5 वर्षांचा करार

Pune Crime News | नोकरीचे आमिष दाखवून ८ जणांची ११ लाखांची फसवणुक; बीपीओ चालकाला अटक

Solapur Crime News | धक्कादायक! सोलापूरमध्ये एकाच कुटुंबातील तीन महिलांची हत्या