Nashik Crime | नाशिकमध्ये मध्यरात्री सामाजिक कार्यकर्ते आणि ‘आरपीआय’चे पदाधिकारी प्रशांत जाधव यांच्यावर गोळीबार

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – Nashik Crime | नाशिकमधील सिडको (Cidco) भागातील उपेंद्रनगर (Upendra Nagar Nashik) परिसरात ‘आरपीआय’च्या एका कार्यकर्त्यावर मोटारसायकलवरुन आलेल्या दोघा हल्लेखोरांनी गोळीबार (Firing In Nashik) केला. त्यात प्रशांत जाधव (Prashant Jadhav) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. ही गोळीबाराची घटना उपेंद्रनगर येथे मध्यरात्री सव्वा बारा वाजता घडली. (Nashik Crime)

 

सामाजिक कार्यकर्ते आणि रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी प्रशांत जाधव हे उपेंद्रनगर येथे असताना दुचाकीवरुन दोघे जण आले. त्यांनी प्रशांत जाधव यांच्या दिशेने २ राऊंड फायर केले. त्यात त्यांच्या मांडीला एक गोळी लागली (Nashik Crime). दुसरी गोळी त्यांच्या पोटाला चाटून गेली. त्यानंतर हल्लेखोर पळून गेले. जखमी अवस्थेतच प्रशांत जाधव यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या घटनेची माहिती मिळताच अंबड पोलीस (Ambad Police Station) घटनास्थळी दाखल झाले असून हल्लेखोरांचा शोध सुरु आहे.

 

Web Title :- Nashik Crime | Prashant Jadhav, a social activist and RPI office bearer is injured in firing Nashik at midnight

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा