×
Homeक्राईम स्टोरीNashik Crime | पतीचा निर्घुण खून करुन पत्नी गेली पळून; दुर्गंधी सुटल्याने...

Nashik Crime | पतीचा निर्घुण खून करुन पत्नी गेली पळून; दुर्गंधी सुटल्याने झाला उलगडा

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – Nashik Crime | वडाळा गावातील माळी गल्लीमधील एका खोलीतून दुर्गंधी बाहेर येत असल्याने पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता घरात ५४ वर्षाच्या पुरुषाचा मृतदेह (Dead Body) आढळून आला. दाम्पत्यामध्ये झालेल्या वादातून पत्नीने आपल्या पतीचा निर्घुण खून (Murder) करुन पळून गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Nashik Crime)

 

दिलीप रंगनाथ कदम Dilip Ranganath Kadam (वय ५४) असे खून (Murder In Nashik) झालेल्याचे नाव आहे. (Nashik Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडाळा गावातील माळी गल्ली – कोळीवाडा रस्त्यावर एका खोलीत कदम दाम्पत्य भाडेतत्वावर रहात होते. कदम हे दहीपुल येथे दुचाकींची दुरुस्तीचा व्यवसाय करीत होते. त्यांनी दुसरे लग्न केल्यामुळे त्यांचा मुलगा गेल्या काही महिन्यांपासून वेगळा रहात होता. तो आपल्या पत्नीसमवेत वडाळा गावात वास्तव्यास होता. गेल्या दोन दिवसांपासून कामाला आला नाही आणि भाऊ भेटला नाही. म्हणून कदम यांचा भाऊ शनिवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घरी गेला. त्यावेळी घर बंद होते. घरातून दुर्गंधी येत होती. त्यांनी मुलगा रोशन याला बोलावून घेतले. काका पुतण्यांनी घराचे कुलूप तोडले. घरात दिलीप कदम रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत पडलेले आढळून आले. त्यांनी इंदिरानगर पोलिसांना (Indiranagar Police) याची माहिती कळविली. मृतदेहाची अवस्था लक्षात घेता त्यांचा खून हा काही दिवसांपूर्वी घडलेला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे. पत्नीनेच त्यांचा खून करुन बाहेरुन कुलूप लावून धुम ठोकली असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

Web Title :- Nashik Crime | The wife ran away after murdering her husband; The stench was revealed

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News