ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन – आज (दि.२६) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) ठाणे दौऱ्यावर आले होते. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर (Shivsena Shinde Group) जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे म्हणाले की, अन्यायावर लाथा मारा हे शिवसेनेचे ब्रीदवाक्य आहेच. ८० टक्के समाजसेवा आणि २० टक्के राजकारण हे आपले ब्रीद आहेच. आपल्याला बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी हीच शिकवण दिली आहे. ही शिकवण मानणारे अस्सल आणि कट्टर शिवसैनिक माझ्यासोबत आहेत. विकाऊ होते ते विकले गेले. असा घणाघात यावेळी ठाणे येथे बोलताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिंदे गटावर केला.
धर्मवीर आनंद दिघे यांच्या जयंती निमित्त आयोजित मोफत महा आरोग्य शिबीर उद्घाटन सोहळा । ठाणे – LIVE
🩸 आपले ठाणे, शिवसेनेचे ठाणे 🩸 #धर्मवीर #दिघेसाहेब #UddhavThackeray @rajanvichare #महाआरोग्यशिबीर #THANE
[ गुरुवार – 2️⃣6️⃣ जानेवारी 2️⃣0️⃣2️⃣3️⃣ ] https://t.co/6LUMQc1V85
— ShivSena – शिवसेना (@ShivSena) January 26, 2023
शिवसेना ठाकरे गटाकडून (Shivsena Thackeray Group) ठाण्यात आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास उद्धव ठाकरे उपस्थित होते. त्यावेळी आयोजीत छोटेखानी भाषणात बोलताना उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) गटावर जोरदार टीका केली. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘जे अस्सल शिवसैनिक निखाऱ्यासारखे माझ्यासोबत राहिले आहेत हे निखारेच उद्या राजकारणात मशाल पेटवणार आहेत.’ असं म्हणतं शिंदे गटाला एकप्रकारे त्यांनी इशारा दिला आहे. तसेच ठाण्यात लवकरचं मोठी सभा घेणार असल्याचेही यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले.
धर्मवीर आनंद दिघे यांच्या जयंती निमित्त ठाणे येथे आयोजित विविध कार्यक्रमांना पक्षप्रमुख श्री.उद्धवसाहेब ठाकरे उपस्थित होते. यावेळी
टेंभी नाका येथील धर्मवीर आनंद दिघे यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करून त्यांनी अभिवादन केले ! pic.twitter.com/lEOdilrfBm— ShivSena – शिवसेना (@ShivSena) January 26, 2023
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आज (दि.२६) ठाणे दौऱ्यावर आले असता.
त्यांनी ठाण्यातील टेंभी नाका परिसरात जाऊन धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या पुतळ्याला
त्यांनी पुष्पहार अर्पण केला. यावेळी ते आनंद आश्रम येथे गेले नाहीत.
यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत राजन विचारे (Rajan Vichare) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) हे देखील उपस्थित होते.
शिवसेना पक्षातील फूटीनंतर प्रथमचं उद्धव ठाकरे हे ठाणे दौऱ्यावर आले.
त्यानिमित्ताने आज ठाण्यात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
यावेळी उद्धव ठाकरे हे आनंद आश्रम याठिकाणी जाणार अशी चर्चा होती.
पण त्याठिकाणी बाळासाहेबांची शिवसेना पक्ष कार्यालय अशी पाटी लावण्यात आली आहे.
त्यामुळेच कदाचित उद्धव ठाकरे यांनी आनंद आश्रम याठिकाणी जाण्याचे टाळले असावे अशी चर्चा ठाण्यात
रंगली आहे.
Web Title :- Uddhav Thackeray | loyal shiv sainiks were with me you know the value of those who were sold says uddhav thackeray
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update