मोठया भावाचाच लहानग्याच्या बायकोवर ‘डोळा’, मोठया भावाचा खून करून त्याला पोत्यात ‘कोंबलं’ !

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – मोठ्या भावाने लहान भावाकडेच त्याच्या पत्नीसोबत अनैंतिक संबंधाची मागणी करत असल्याच्या रागातून लहान भावाने मोठ्या भावाचा कुऱ्हाडीने वार करून खून केला. खून करून मृतदेह पोत्यात भरून शेतात लपवून ठेवला. रात्री शेतात कोणी नसल्याचे पाहून मृतदेह ठेवलेले पोते रस्त्याच्याकडेला फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये उघडकीस आला. याप्रकरणी पोलिसांनी लहान भावासह त्याच्या चुलत भावाला अटक केली आहे.

रफिक शेख असे खून झालेल्या मोठ्या भावाचे नाव आहे. पोलिसांनी लहान भाऊ तौफिक शेख आणि चुलत भाऊ सलमान शेख यांना अटक केली आहे. हा प्रकार नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील माणिकपुंज गावामध्ये घडला आहे. नांदगाव पोलिसांनी आरोपींना अटक केली असून याप्रकरणी रफिकच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

तीन दिवसांपूर्वी रफिक शेख याचा मृतदेह शेताच्या कडेला आढळून आला होता. पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला. त्यावेळी पोलिसांना रफिकचा लहान भाऊन तौफिक याच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. रफिक हा दादागिरी करून तौफिकला त्याच्या पत्नीसोबत अनैंतिक संबंध ठेवण्याची मागणी करत होता. याच कारणावरुन त्यांच्यामध्ये वाद होत होते. पत्नीसोबत अनैतिक संबंध ठेवण्याची मागणी केल्याने राग आला होता. याच रागातून खून केल्याची कबुली आरोपी तौफिकने पोलिसांकडे दिली.

मोठ्या भावानेच पत्नीसोबत अनैंतिक संबंध ठेवण्याची मागणी केल्याने त्याचा काटा काढण्याचा कट तौफिकने आठ दिवसांपूर्वीच रचला होता. २३ जुलै रोजी तौफिकने आणि त्याचा साथीदार चुलत भाऊ सलमानने वीज पंप सुरु होत नसल्याचे सांगून रफिकला शेतात बोलावून घेतले. रफिक शेतात आला असता दोघांनी त्याच्यावर कुऱ्हाडीने वार केले. रफिकच्या डोक्यात कुऱ्हाडीचा वर्मी घाव बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. खून केल्यानंतर त्याचा मृतदेह एका पोत्यात भरून शेतामध्ये लपवून ठेवला. रात्री बारानंतर मृतदेह ठेवलेले पोते गावाच्या रस्त्यालगत फेकून दिले. या घटनेमुळे गावामध्ये खळबळ उडाली आहे. पुढील तपास नांदगाव पोलीस करीत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –