Nashik News । चक्क शाळेतच शिक्षकाचा ‘झिंगाट’; Video व्हायरल

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama online) – Nashik News । शाळा हे ज्ञानाचं मंदिर आहे. शाळेतून विद्यार्थ्याला भविष्याची वाटचाल करण्यास भाग पाडते. त्यातून यशाच्या वाटेकडे नेण्यासाठी शाळेची साथ महत्वाची असते. शाळेतील शिक्षक (Teacher) विद्यार्थ्यांना ज्ञान देत असतो मात्र, हेच शिक्षक जर नियमांचे उल्लंघन करत असेल तर विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे यश धोक्यात येत असते. असाच एक प्रकार नाशिक (Nashik) येथील त्र्यंबकेश्वर मधील एका शाळेत घडला आहे. या शाळेच्या शिक्षकाने शाळा दारूचा अड्डा करून टाकला आहे. शाळेतच मद्यपान करून झिंगाट झाल्याचा व्हिडिओ (Video) समाज माध्यमावर प्रसारित झाला आहे.

ही घटना नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर जवळील दापूरे गावातील असल्याची माहिती मिळत आहे. तेथील गावकऱ्यांनी शिक्षकाच्या या कृत्याचा निषेध केला आहे. संबंधित शिक्षक दापूरे गावातील ग्रामपंचायतीच्या शाळेत शिकवतो. कोरोनामुळे लॉकडाऊन असल्यानं शाळा बंद आहेत, या शिक्षकानं शाळेलाच आपल्या दारुचा अड्डा बनवला आहे. दारू पिऊन मद्यधुंद होऊन झिंगाट शिक्षकाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्या भान नसलेल्या शिक्षकाने चक्क शाळेत असले कृत्य केले आहे. या कृत्यामुळे तेथील गावकऱ्यांनी त्या शिक्षकाची चांगलीच खरडपट्टी काढली आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram,
facebook page and Twitter for every update

Web Title : nashik news | teacher drunk in school video viral

हे देखील वाचा

Modi Cabinet Expansion | PM मोदींचे सर्व कार्यक्रम रद्द, मंत्रिपदासाठी ‘ही’ संभाव्य यादी तयार; महाराष्ट्रातून ‘या’ नेत्यांची नावं

Bibwewadi Police | चौघींसोबत झेंगाट अन् 53 जणींसोबत लग्नाची बोलणी करत 53 लाखांना गंडा, पोलिसांकडून भामट्याला अटक; जाणून घ्या प्रकरण

Nana Patole । नाना पटोलेंचे विधानसभेत गंभीर आरोप; म्हणाले – ‘माझा फोन टॅप केला आणि नाव ठेवलं अमजद खान’