नाथसागरमधून गोदावरी पात्रात 25 हजारांवर क्युसेकने विसर्ग

पोलिसनामा ऑनलाईन टीम – मुसळधार पावसामुळे पैठण येथील नाथसागरच्या 12 दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दरवाज्यांची उंची कालपासून सुमारास दीड फुटापर्यंत नेण्यात आलेली आहे. तर सहा दरवाज्यांची उंची एक फुटापर्यंत करून त्यातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे. दरवाजातून सहा हजार 288 क्युसेक विसर्ग गोदावरी नदीच्या पात्रात वाढवण्यात आलेला आहे.

सद्यस्थितीत सांडव्यांमधून एकून 25 हजार 152 क्युसेकचा विसर्ग गोदावरी नदी पात्रात सुरू आहे. त्यात सहा हजार 288 हा दीड फुटाने उचललेल्या दरवाजातून तर उर्वरित ठिकाणाहून 18 हजार 864 क्युसेकचा समावेश आहे. राज्याचे मुख्य सचिव संजयकुमार यांनी नाथसागरला भेट देऊन जलपूजन केले होते. या वेळी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्यासह गोदावरी रोहयोमंत्री संदिपान भुमरे, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक एन. व्ही. शिंदे, उपस्थित होते.

यावेळी नाथसागरच्या मजबुतीकरणाबाबत व सुरक्षेबाबतचा आढावा घेण्यात आला होता. नाथसागरात यंदा सलग दुसर्‍यांदा 100 टक्क्यांपर्यंत पाणीसाठा झालेला आहे. यंदा 3 सप्टेंबर रोजी उजव्या कालव्यातून सुरुवातीला 200 क्युसेकने माजलगाव धरणात पाणी सोडण्यात आले. त्यानंतर डाव्या कालव्यातून विसर्ग सुरू झाला. तर 6 सप्टेंबर रोजी रात्री नाथसागराचा पाणीसाठा 99 टक्क्यांपर्यंत आल्याने आठ दरवाजातून विसर्ग सुरू झाला.