चिंताजनक ! दिल्लीत 63 % तर युपीमध्ये 59 % बाधित रूग्णांची लिंक तबलिगी जमातींशी, 23 राज्यात पसरवला ‘कोरोना’ : केंद्र सरकार (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोना व्हायरसचे प्रमाण वाढत चालले असून सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार आतापर्यंत देशातील बहुतेक आकडेवारी दिल्लीच्या निजामुद्दीन येथे आयोजित तबलिगी जमात कार्यक्रमाशी संबंधित आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार देशात आतापर्यंत कोरोना संसर्गाची १४,३७८ प्रकरणे समोर आली आहेत, त्यापैकी ४,२९१ म्हणजे २९.८ टक्के प्रकरणं केवळ तबलिगी जमात आयोजनाशी संबंधित आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल म्हणाले की, तबलिगी जमातमधील सदस्यांमुळे देशातील २३ राज्यांत कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढला आहे. तामिळनाडूमध्ये ८४ टक्के, दिल्लीत ६३ टक्के, तेलंगणामध्ये ७९ टक्के, आंध्र प्रदेशात ६१ टक्के, तर उत्तर प्रदेशात ५९ टक्के लोक संक्रमित तबलिगी जमातमधील आहेत किंवा या जमातच्या संपर्कात आले होते. सरकारच्या मते देशात संक्रमणाने झालेल्या मृत्यूचे प्रमाण ३.३ टक्के आहे, जे इतर देशांपेक्षा खूपच कमी आहे.

हे सांगणे देखील आवश्यक आहे की, तबलिगी जमातमधील सदस्यांनी केवळ भारतासाठीच समस्या निर्माण केल्या नाहीत. तबलिगी जमातमधील लोक पाकिस्तान, मलेशिया आणि ब्रुनेईमध्ये देखील कोरोना विषाणूच्या संक्रमणाचे मोठे वाहक असल्याचे सिद्ध होत आहे. पाकिस्तानच्या सिंध प्रांतात तबलिगी जमातचे ४९२ सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. या ४९२ सदस्यांनी पंजाब प्रांतातील रावळपिंडी येथे वार्षिक धार्मिक समारंभास हजेरी लावली होती. तसेच पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील तबलिगी जमातमधील संक्रमित सदस्यांची संख्या १,१०० च्या वर गेली आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या मते आतापर्यंत कोरोना संसर्गामुळे होणाऱ्या मृत्यूंपैकी ८३ टक्के मृत्यू वयोवृद्ध किंवा असे लोक होते ज्यांना इतर आजार होते. देशात ४५ असे जिल्हे आहेत जिथे गेल्या १४ दिवसांपासून प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. केंद्रीय आरोग्य विभाग टीम प्रशासनासह सर्व आवश्यक पावले उचलत आहे. हे आश्वासन देणारे आहे की यापूर्वी २३ राज्याच्या ४७ जिल्ह्यांमध्ये संक्रमित मिळाले होते २८ दिवसांपासून कोणतेही प्रकरण समोर आलेले नाही. सरकारचे म्हणणे आहे कि २० एप्रिलपासून लॉकडाऊनमध्ये सवलत देण्याबाबत गाइडलाइन्स जारी केल्या जातील.