आज भारतात पोहचणार पंतप्रधान, राष्ट्रपतींचा ‘अभेद्य किल्ला’ Air India One, जाणून घ्या काय आहे खासियत

पोलीसनामा ऑनलाइन : राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्यासाठी दोन व्हीव्हीआयपी एअर इंडिया वन भारताने मागितले होते. त्यापैकी पहिले विमान आज भारतात येत आहे. दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर ते येणार असल्याची माहिती एएनआय या सरकारी वृत्तसंस्थेने दिली आहे.

सध्या पंतप्रधान, राष्टपती आणि उपराष्ट्रपती एअर इंडिया बी 747 या विमानाने प्रवास करतात. पंतप्रधान व इतर व्हीव्हीआयपी लोकांनी वापरलेल्या या विमानांना एअर इंडिया वन असे म्हटले जाते. यापूर्वी पंतप्रधान तसेच बाकी व्हीव्हीआयपी लोकांनी वापरलेले B747 विमान व्यावसायिक कामांसाठी वापरले जातील. असे पीएमओ तील अधिकाऱ्यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले.

ते म्हणाले की, एअर इंडिया वन एक सुरक्षित, सुसज्ज आणि ऍडव्हान्स विमान आहे की जे हॅक किंवा टॅप न करता मध्यम हवा ऑडिओ आणि व्हिडिओ संप्रेषण कार्याचा लाभ घेऊ शकते. हे नवीन डिझाइन केलेले व्हीआयपी विमान आज अमेरिकेतून दिल्ली मध्ये दाखल होणार आहे .

एअर इंडिया वन विमानाची वैशिष्ट्य:

पंतप्रधान आणि राष्ट्रपती, उपराष्ट्रपती यांच्यासाठी डिझाइन केलेले हे खास विमान अनेक वैशिष्ट्यांसह सज्ज आहे. यात एक क्षेपणास्त्र अ‍ॅप्रोच वॉर्निंग सिस्टम आहे, जो पायलटला सेन्सर च्या मदतीने अन्य क्षेपणास्त्रांवर हल्ला करता येते.. याव्यतिरिक्त, विमानामध्ये इलेक्ट्रॉनिक वॉरफेयर जॅमर आहे, जे समोरच्याचे जीपीएस आणि ड्रोन सिग्नल जॅम करते. यात अजून चाफ अँड फेअर्स सिस्टीम आहे जी विमानाला इतर धोक्यापासून वाचवते.