महिला वैमानिक घडविणार इतिहास, जगातील सर्वात लांब हवाई मार्गावर करणार उड्डाण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पहिली एअरलाइन कंपनी एअर इंडिया ( Air India) आणखी एक पराक्रम गाजवणार आहे. यावेळी एअर इंडियाच्या ( Air India)महिला वैमानिकांची एक टीम सर्वात लांब मार्गावरुन उड्डाण करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हि टीम जगातील सर्वात लांब हवाई मार्गावर उत्तर ध्रुवावर उड्डाण करेल आणि सॅन फ्रान्सिस्को (एसएफओ) येथून 9 जानेवारीला बंगळुरूला पोहोचेल आणि सुमारे 16,000 किमी अंतर पार करेल.

उत्तरी ध्रुवाच्या वरून उड्डाण करणे खूप आव्हानात्मक
एअर इंडियाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, उत्तर ध्रुवावर उड्डाण करणे खूप आव्हानात्मक आहे आणि विमान कंपन्या या मार्गावर आपले उत्तम आणि अनुभवी पायलट पाठवतात. यावेळी एअर इंडियाने महिला कॅप्टनला सॅन फ्रान्सिस्को ते बंगळुरू पर्यंत ध्रुवीय मार्गाने प्रवास करण्याची जबाबदारी दिली आहे.

महिला वैमानिकांच्या संघात यांचा समावेश
वृत्तसंस्था एएनआय च्या मते, कॅप्टन झोया अग्रवाल म्हणाल्या की, माझ्या संघात कॅप्टन पापागारी, आकांक्षा सोनवणे आणि शिवानी मनहास सारख्या अनुभवी कॅप्टन आहेत, याचा मला अभिमान आहे. असे प्रथमच घडले आहे की, अशी पायलटची टीम उत्तर ध्रुवाच्यावर उड्डाण करेल, ज्यात फक्त महिला असतील आणि एक प्रकारे या इतिहास घडवतील. कोणत्याही व्यावसायिक कॅप्टनसाठी हे स्वप्न असेल जे साकार होणार आहे.