जम्मू काश्मीरमध्ये सैन्यानं 25 किलोचे स्फोटक केली ‘नष्ट’, दहशतवादी हल्ल्याचा प्रयत्न हाणून ‘पाडला’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतील सैन्याने एका मोठ्या दहशतवादी हल्ल्याला हाणून पाडले. सैन्याच्या बॉम्ब शोधक पथकाने राष्ट्रीय महामार्ग 11 वरील खुदवानी पुलाजवळ लावण्यात आलेल्या 25 किलोच्या इंप्रोवाइज्ड एक्सप्लोसिव डिवाइसला आयईडीला नष्ट केले. 21 नोव्हेंबरला सैन्याच्या विजिलेंस तुकडीने केलेल्या तपासणीत महामार्गावर आयईडी असल्याचे लक्षात आले. यानंतर हा भागाला रिक्त करण्यात आला आणि सैन्याच्या बॉम्ब शोधक पथकाला पाचारण करण्यात आले.

धोका असताना देखील बॉम्ब शोधक पथकाने जमिनीत गाडण्यात आलेल्या आयईडीला बाहेर काढले. दहशतवाद्यांनी हे बॉम्ब दोन सिलेंडरच्या आकाराच्या कंटेनरमध्ये ठेवले होते. सैन्याच्या मते एका कंटेनरमध्ये 15 किलो आणि दुसऱ्यात 10 किलो स्फोटके होती. पथकाने आयईडीला त्याच ठिकाणी नष्ट केले.

सैन्याच्या मते जर ही स्फोटके वेळेत नष्ट केली नसती तर येथे मोठी हानी झाली असती. हा स्फोट घडवून आणण्यामागे दहशतवाद्यांचा हेतू होता की काश्मीर खोऱ्यातील सुधारणारी परिस्थिती गढूळ करणे.

Visit : Policenama.com