काळजी घ्या ! देशभरात पुन्हा वाढतोय ‘कोरोना’चा संसर्ग; अवघ्या 24 तासांत 22854

ADV

नवी दिल्ली : देशभरात कोरोना व्हायरसवरील लसीकरण मोहीम सुरू आहे, तर दुसरीकडे कोरोना व्हायरसचा संसर्ग पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. भारतात गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येने उच्चांक गाठला आहे. देशात मागील 24 तासांत 22,854 नवे प्रकरणे समोर आली आहेत.

ADV

कोरोना व्हायरसचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यानुसार, विविध उपाययोजना केल्या जात आहेत. असे असताना गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी दिसत होती. मात्र, आता यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. देशात 24 तासांत 22,854 नवे प्रकरणे समोर आली आहेत. यावरून एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1,12,85,561 झाली आहे, तर आत्तापर्यंत 1,09,38,146 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामध्ये आणखी 126 कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोना व्हायरसचा संसर्ग होऊन आत्तापर्यंत 1,58,189 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, यापूर्वी 25 डिसेंबर रोजी देशात एक दिवसात 23,067 कोरोनाबाधित प्रकरणे समोर आली होती. त्यानंतर आता रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. सध्या कोरोनाबाधित रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण 96.92 टक्के झाले आहे, तर मृत्यूदर हा 1.40 टक्क्यांवर गेला आहे.