चिनी मास्कपासून आता लवकरच सुटका, उत्पादनासाठी उतरल्या ‘स्वदेशी’ मोठ्या कंपन्या

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –  चीनमधील मास्कची वाढती आयात रोखण्यासाठी आणि निर्यातीच्या संभाव्यतेकडे पाहता देशांर्गत छोट्या मोठ्या जवळपास शंभर कंपन्या मास्क उत्पादनाच्या क्षेत्रात उतरल्या आहेत. मास्कची गुणवत्ता राखण्यासाठी देशांतर्गत उत्पादकांशीही आयात केलेल्या मास्कची चाचणी केली जाईल. एन- 95 कॅटेगरीचा मास्क बनवणाऱ्या देशांतर्गत कंपन्यांना आता ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डने निश्चित केलेल्या मानकांची पूर्तता करावी लागेल.

एन -95 मास्क तयार करण्यासाठी बीआयएस मानक आवश्यक

भारतीय मानक ब्यूरोचे महासंचालक प्रमोद कुमार तिवारी म्हणाले की, मास्कचा गुणवत्तेकडे विशेष लक्ष दिले जात आहे. घरगुती कंपन्यांना दर्जेदार मास्क तयार करण्यासाठी आयएसआय मानक अवलंब करावा लागेल. रुग्णालयांमध्ये वापरल्या जाणार्‍या मास्कचा गुणवत्तेकडे विशेष लक्ष दिले जात आहे. सध्या देशात अशा 13 कंपन्या आहेत ज्या आयएसआय मार्क असलेल्या एन -95 प्रकारातील मास्क बनवत आहेत. तर 85 कंपन्यांनी बीआयएसच्या प्रमाणपत्रासाठी अर्ज केले आहेत. यापैकी बर्‍याच उत्पादनांची चाचणी विविध प्रयोगशाळांमध्ये सुरू आहे.

अरविंद मिल्स आणि वेलस्पन दररोज तयार करणार साडेतीन लाख मास्क

तिवारी यांनी पुढे म्हंटले कि, एन- 95 कॅटेगरी मास्क देशातील रुग्णालयांमध्ये वापरला जातो. वेलस्पन आणि अरविंद मिल्स सारख्या मोठ्या कंपन्यांनी मास्क बनविण्यासाठी आयएसआय मानक अर्ज केला आहे. यापैकी वेलस्पनची उत्पादन क्षमता दिवसाला दीड लाख तर अरविंद मिल्सची 2 लाख मास्क आहे. मास्कच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अद्याप चीनमधून मास्क आयात केले जात आहेत, परंतु बीआयएसच्या प्रयोगशाळेत आयात केलेल्या मास्कची गुणवत्ता तपासली जात आहे. या आठवड्यात चीनहून आलेल्या दोन खेप मास्कची तपासणी कोयंबटूरमधील मिडास आणि मुंबईतील मॅग्नम लॅबमध्ये केली जात आहे.

सरकारने पीपीई किटसंदर्भातही निश्चित केली मानके

पर्सनल प्रोटेक्टिव अ‍ॅक्युपायमेंट (पीपीई) किटबाबतही सरकारने मानक निश्चित केले आहे. रुग्णालयांमध्ये पुरवठा करण्यासाठी मानक पूर्ण करणे आवश्यक आहे. पीपीई किट उत्पादकांबरोबर बुधवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये भारतीय मानक ब्युरोला मानक लागू करण्याची सूचना देण्यात आली आहे. मास्क आणि पीपीई किटसारख्या उत्पादनांच्या निर्यातीच्या मागणीमुळे कंपन्या या क्षेत्रात सातत्याने प्रयत्न करत आहेत.