Coronavirus : ‘कोरोना’मुळं लोक स्वतःची कमी आणि आपल्या आप्तांच्या आरोग्याची काळजी घेतात जास्त

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   कोरोना विषाणूमुळे लोकांमध्ये एवढी भीती निर्माण झाली की लोक चिंता करण्यापेक्षा त्यांच्या नातेवाईकांच्या आरोग्याबद्दल जास्त काळजी घेत आहे. संशोधकांना एका अभ्यासानुसार असे आढळले आहे की, शरीरातील किरकोळ बदलांविषयी लोक अधिक सावध झाले आहे, अगदी ताप, खोकला आणि शिंका येणे याची जाणीव देखील झाली तरी लोक सतर्क झाले आहे. आकडेवारीनुसार, जवळजवळ 82.२5 टक्के लोक स्वतःपेक्षा आपल्या प्रियजनांच्या आरोग्याविषयी अधिक चिंतीत आहेत.

गोवा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटने केलेल्या अभ्यासात असे दिसून आले आहे की, प्राणघातक कोरोना संक्रमणाविषयी सोशल मीडियावर फॉरवर्ड करणारा संदेश वाचून देखील लोक खूप निराश होत आहे. इतकेच नव्हे तर लॉकडाऊन दरम्यान 41 टक्के लोक योग किंवा व्यायामासारखे शारीरिक हालचाली करत नाहीत. अशा परिस्थितीमध्ये योगाचे महत्त्व वाढले आहे.

वृत्तसंस्था पीटीआयच्या वृत्तानुसार, कोरोना प्रादुर्भावाची चिंता, यापासून वाचण्यासाठी मार्ग आणि मानसिक प्रतिक्रिया यांच्या संदर्भात डॉ. दिव्या सिंघल आणि गोवा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे प्रा. पद्मनाभन विजयराघवन प्रा. यांनी अभ्यास केला यात देशाच्या विविध भागात राहणाऱ्या 231 लोकांचा समावेश केला गेला.

अभ्यासानुसार असे आढळले आहे की, बहुतेक लोकांना आता शरीरात होणाऱ्या बदलांविषयी अधिक माहिती आहे. कोविड -19 च्या लक्षणांबद्दल लोकांना अधिक माहिती आहे जसे की सर्दी, खोकला, शिंका येणे. अशा परिस्थितीत जेव्हा ही प्राणघातक महामारी आपला उग्र स्वरुप दर्शवित आहे, तेव्हा लोकांमध्ये असलेली ही जागरूकता त्यास पराभूत करण्यात खूप उपयुक्त ठरू शकते. या अभ्यासात असे दिसून आले आहे की 50 टक्के लोक सोशल मीडियावर जास्त वेळ घालवतात आणि अधिक चित्रपट पाहत आहेत.

या अभ्यासात असे दिसून आले आहे की, लोक मित्र आणि नातेवाईकांशी संपर्क साधण्यासाठी मोबाईल फोन इत्यादी तंत्रज्ञानाचा अवलंब करीत आहेत आणि त्यामुळे त्यांचा वापरही वाढला आहे. अभ्यासामध्ये भाग घेणाऱ्या 231 लोकांपैकी 145 पुरुष आणि 86 महिला होत्या. 47.6२ टक्के लोक खासगी किंवा सरकारी क्षेत्रातील आहे अभ्यास तर बाकीचे विद्यार्थी, सेवानिवृत्त कर्मचारी आणि गृहिणी आहेत.