‘या’ आध्यात्मिक ‘गुरू’कडं सापडली ‘महामाया’, 44 कोटींची रोकड व 90 किलो सोनं ‘इन्कम टॅक्स’कडून जप्त

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – स्वतःला ‘कल्की भगवान’ म्हणवणाऱ्या विजय कुमार नायडू यांच्यावर आयकर विभागाने छापा मारला आहे. कल्की भगवान आणि त्यांचा मुलगा कृष्णा यांचे अनेक राज्यामध्ये असलेले आश्रम सध्या आयकर विभागाच्या रडारवर आहे. तामिळनाडू, तेलंगणा, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात यांचे आश्रम आहेत.

आयकर विभागाने मारलेल्या छाप्यात 44 कोटी रुपये कॅश यामध्ये 20 कोटी रुपये अमेरिकन डॉलर तसेच 90 किलो सोने जप्त केले आहे. चेन्नई, हैद्राबाद, बँगलोर, चित्तूर आणि कुप्पम येथील आश्रमांवरच छापे टाकण्यात आले आहेत.

आंध्र प्रदेशासोबतच त्यांनी आपल्या आश्रमांचे जाळे इतर राज्यांमध्ये देखील वाढवले. या आश्रमांमध्ये मोठं मोठे धनिक लोक आणि विदेशी नागरिक देखील येत असतात. कल्की भगवान यांचे दर्शन करण्यासाठी पाच हजार रुपये आणि विशेष दर्शन घेण्यासाठी पंचवीस हजार रुपये द्यावे लागत असे. 2010 मध्ये न्यायालयाने कृष्णा यांच्यावर जमिनी हडपल्या प्रकरणी तपासाचे आदेश दिले होते. 2008 मध्ये चित्तूर जिल्ह्यातील आश्रमात झालेल्या गोंधळामुळे पाच लोकांच्या मृत्यू सोबत अनेक लोक जखमी झाले होते यामुळे अनेक दिवस आश्रम बंद होता.

विजय नायडू उर्फ कल्की भगवान एलआयसीमध्ये क्लर्कची नोकरी करत होता. त्यानंतर त्याने शिक्षण संस्था सुरु केली मात्र संस्थेचे दिवाळे निघाले त्यानंतर नायडू गायब झाला आणि 1989 मध्ये पुन्हा चित्तूर येथे आला आणि स्वतःला विष्णूचा दहावा अवतार ‘कल्की भगवान’ सांगू लागला.

Visit  :Policenama.com