जाणून घ्या काय आहे ‘कुलिंग पिरियड’, कोविड-19 च्या प्रकरणात अखेर का आहे खास

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तज्ज्ञांनुसार, कोणत्याही देशात कोविड-19 च्या संसर्गानंतर जर हार्ड इम्युनिटी मिळत असेल तर, त्याची संसर्गाची चेन तूटते. यामुळे दररोज नवीन प्रकरणांची संख्या कमी होऊ लागते. ही घट लागोपाठ सुमारे तीन महिन्यांपर्यंत जारी राहाते. हे यामुळे होते, कारण तमाम संशोधनांमधून ही गोष्ट समोर आली आहे की, एकदा संसर्गानंतर कोणत्याही व्यक्तीच्या शरीरात किमान तीन महिनेपर्यंत अँटीबॉडी प्रभावी राहाते. या तीन महिन्यांनाच तज्ज्ञ कुलिंग पिरियड म्हणतात. यामध्ये नव्या प्रकरणांचा ग्राफ लागोपाठ खाली घसरतो, परंतु संक्रमित व्यक्तींमध्ये अँटीबॉडीचा प्रभाव कमी किंवा नष्ट होताच, ते संक्रमित होऊ लागतात आणि संसर्गाच्या नव्या काळाची किंवा लाटेची सुरूवात होते. पश्चिमेतील तमाम देशांचे चित्र यास दुजोरा देत आहे.

सुखद बाजू
भारताच्या बाबतीत ही चांगली बाब आहे की, जोपर्यंत येथे संसर्गाच्या नवा काळाची सुरूवात होईल, तोपर्यंत या महामारीची वॅक्सीन येईल. या महत्वाच्या कालावधीदरम्यान आपल्या सर्वांना इम्युनिटी कायम राखण्याचा प्रयत्न करावा लागेल. आपले दैनंदिन कामकाज करताना आवश्यक खबरदारी घ्यावी लागेल.

भारताची स्थिती
देशव्यापी सीरो सर्वेत हे समजले की, जेवढे संक्रमित समोर असतात, प्रत्यक्षात त्यांची संख्या त्याच्या ऐंशीपटच्या जवळपास असते. यानुसार जर आज एकुण संक्रमितांची संख्या 50 लाखांच्या वर असेल तर त्यांची प्रत्यक्ष संख्या सुमारे 50 कोटी असू शकते. म्हणजे सुमारे अर्ध्या लोकसंख्येला कोरोनाने संक्रमित केलेले आहे.

अशा स्थितीत देश हार्ड इम्युनिटीच्या जवळ आहे. संसर्गाच्या या स्थिर अवस्थेला दुजोरा रोज येणारी नवीन प्रकरणे सुद्धा देतात. चाचण्यांच्या बाबतीत भारत आघाडीवर आहे. रोज येथे 10 ते 13 लाख टेस्ट होत आहेत, परंतु नव्या प्रकरणांची संख्या 90 ते 98 हजारच्या दरम्यान फिरत आहे. म्हणजे ही एक स्थिर आवस्थेचे चित्र दाखवते. पाश्चिमात्य देशांचा अनुभव सांगतो की, प्रकरणांत घसरणीच्या पूर्वी अनेक दिवसांपर्यंत येणार्‍या नव्या प्रकरणांची संख्या स्थिर राहात होती. म्हणजे भारतामध्ये आता नव्या प्रकरणांच्या संख्येत उत्तरोत्तर घट दिसून येऊ शकते आणि तीन महिन्यांपर्यंत हा प्रकार जारी राहू शकतो. यानंतर देशात संसर्गाचा नवा काळ सुरू होऊ शकतो.

ब्रिटन
ब्रिटेनमध्ये एप्रिल आणि मेमध्ये खुप वेगाने संसर्गाची प्रकरणे समोर आली. यानंतर जून, जुलै आणि ऑगस्टमध्ये संसर्गाच्या प्रकरणात अपेक्षेप्रमाणे घसरण नोंदली गेली. मात्र, पुन्हा एकदा येथे प्रकरणांमध्ये वाढ होत आहे.

स्पेन
मार्च आणि एप्रिलमध्ये रोज मोठ्या संख्येने प्रकरणे समोर आली आहेत. यानंतर कुलिंग पिरियडच्या दरम्यान घसरण दिसली. मे आणि जूनमध्ये दैनंदिन प्रकरणे 500 पेक्षा सुद्धा कमी झाली आहेत. आता येथे वाढ सतत जारी आहे.

फ्रान्स
फ्रान्सची स्थिती सुद्धा अशीच आहे. येथे मार्च, एप्रिलच्या मध्यावर आकडे खुपच वेगाने वाढले, परंतु मे, जून आणि जुलैमध्ये घसरण झाली. मात्र, येथे सुद्धा कोरोना संसर्गाची दुसरी लाट प्रकरणांच्या संख्येत वाढ करत आहे.

इटली
इटलीमध्ये मार्चच्या अखेरीस सर्वाधिक प्रकरणे समोर आली होती. मात्र, एप्रिलमध्ये यात घसरण येऊ लागली, परंतु ही जुलै, ऑगस्टमध्ये तर अनेकदा दैनंदिन प्रकरणे 200 पेक्षा सुद्धा कमी येऊ लागली. मात्र, आता प्रतिदिन एक हजारपेक्षा जास्त प्रकरणे समोर येत आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like