थप्पड कांड : ‘कलेक्टर’च्याविरोधात BJP वाले पोहचले कोर्टात, जाणून घ्या – निधी निवेदिता यांच्याबाबत

राजगढ : पोलीसनामा ऑनलाइन – मध्य प्रदेशच्या राजगढच्या जिल्हाधिकारी निधी निवेदिता यांचे नाव सध्या राज्यात चर्चेचा विषय झाले आहे. सीएएच्या समर्थनासाठी रॅली काढणार्‍या भाजपा नेत्याला थप्पड मारल्याने चर्चेत आलेल्या निधी निवेदिता यांनी एका एएसआयलाही थप्पड मारली होती. भाजपा कार्यकर्ते सुद्धा कलेक्टरला सोडण्याच्या मूडमध्ये दिसत नाहीत. ब्यावरा थप्पड प्रकरणी येथील भाजपावाल्यांनी कलेक्टर निधी निवेदिता आणि डेप्युटी कलेक्टर प्रिया वर्मा यांच्याविरोधात न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.

19 जानेवारीला ब्यावरामध्ये सीएए समर्थन रॅलीच्या दरम्यान कलेक्टरने भाजपा जिल्हा मीडिया प्रमुख रवी बडोने यांच्या कानशिलात लगावली होती. डेप्युटी कलेक्टर प्रिया वर्मा यांनी सुद्धा अन्य भाजपा कार्यकर्त्यांना मारहाण केली होती. भाजपावाल्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी दोन्ही अधिकार्‍यांवर कारवाई न केल्याने 12 भाजपा कार्यकर्त्यांनी ब्यावराच्या प्रथम श्रेणी न्याय मॅजिस्ट्रेट विपिन साकेत यांच्या न्यायालयात वेगवेळे अर्ज केले आहेत, ज्यामध्ये कलेक्टर आणि डेप्युटी कलेक्टर यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. यामध्ये नरसिंहगढचे माजी आमदार मोहन शर्मा, राजगढचे माजी आमदार अमरसिंह यादव, जिल्हा मीडिया प्रमुख रवी बडोने, विहिप जिल्हा मंत्री मुकेश सेन, विकास करोडिया, दीपकमल शर्मा यांचा समावेश आहे. याप्रकरणी सुनावणीच्या वेगवेगळ्या तारखा देण्यात आल्या आहेत.

कोण आहेत निधी निवेदिता

निधी निवेदिता 2012 बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. त्या मुळच्या झारखंडच्या सिंदरी येथील असून त्यांची पहिली पोस्टींग झाबुआमध्ये असिस्टंट कलेक्टर म्हणून झाली होती. याशिवाय त्या एकात्मिक बाल विकास योजनेच्या प्रोजेक्ट डायरेक्टर आणि इंदोरच्या अ‍ॅडिशनल कलेक्टर सुद्धा होत्या. सिंगरौली जिल्ह्यात जिल्हा परिषद सीईओ असताना त्यांनी शौचालय घोटाळा करणार्‍या परिषदेच्या सचिवाला उठाबशा काढायला लावले होते.

राजगढमध्ये सीएएच्या समर्थनसाठी काढलेल्या रॅलीत एका भाजपा कार्यकर्त्याला मारल्यानंतर निधी यांना चारही बाजूने घेरले आहे. एएसआयला थप्पड मारण्याची घटना समोर आल्यानंतर मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ट्विट केले की, सिद्ध झाले आहे की, राजगढ कलेक्टर यांनी आपल्या मर्यादा ओलांडून संसदेत झालेल्या कायद्याचे समर्थन करणार्‍या कार्यकर्त्यांना थप्पड लगावल्या होत्या आणि यासोबतच एका एएसआयलाही थप्पड मारली. कमलनाथजींना माझा प्रश्न आहे की, काय अजूनही यांना वाचवायचे की यांच्यावर कारवाई करायची?