National Lok Adalat | पुणे जिल्हा सलग नवव्यांदा दावे निकाली काढण्यात राज्यात प्रथम

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – National Lok Adalat | प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश (District and Sessions Judge) तथा पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे (Pune District Legal Services Authority) अध्यक्ष श्याम चांडक (Shyam Chandak) यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये (National Lok Adalat) ७८ हजार २०६ प्रलंबित दावे (pending Claims) निकाली (Settlement) काढून पुणे जिल्ह्याने राज्यात पुन्हा एकदा प्रथम स्थान पटकावले. सतत नवव्यांदा जिल्ह्याने दावे निकाली काढण्यातील प्रथम स्थान कायम ठेवले आहे.

 

राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये (National Lok Adalat) बँकेचे कर्जवसूली १ हजार २७७, तडजोड पात्र फौजदारी ७ हजार ८१९, वीज देयक २४७, कामगार विवाद खटले ७, भुसंपादन ११८, मोटार अपघात दावे न्यायाधिकरण १२५, वैवाहिक विवाद २१७, निगोशिएबल इन्स्ट्रूमेंट ॲक्ट (Negotiable Instruments Act) १ हजार ५२५, इतर दिवाणी ६७४, महसूल २०३, पाणी कर ६१ हजार ९९०, ग्राहक विवाद ६ आणि इतर ३ हजार ९९८ प्रकरणे अशी एकूण ७८ हजार २०६ प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत.

तडजोडीसाठी ठेवण्यात आलेल्या २ लाख २४ हजार ५१६ दाव्यापैकी १३ हजार ७९५ दावे निकाली काढण्यात येऊन ७० कोटी ७२ लाख ४४ हजार ४२६ रुपये तडजोड शुल्क वसूल करण्यात आला. वादपूर्व १ लाख ९६ हजार ८ प्रलंबित प्रकरणांमधून ६४ हजार ४११ प्रकरणे निकाली काढण्यात आली आणि यात ४६ कोटी ८३ लाख ७८ हजार ३८४ तडजोड शुल्क वसूल करण्यात आले. एकूण ७८ हजार २०६ प्रलंबित दावे निकाली काढण्यात येऊन ११७ कोटी ५६ लाख २२ हजार ८१० रुपये तडजोड शुल्क म्हणून वसूल करण्यात आले.

 

लोकअदालतीच्या माध्यमातून विभक्त झालेले संसारही जोडले गेले आहेत. घटस्फोटासाठी (Divorce) अर्ज केलेल्या ६ जोडप्यांनी समुपदेशनानंतर परत एकदा एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. त्यापैकी एक जोडपे गेल्या १५ वर्षापासून वेगळे रहात होते. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सुधीर बर्डे (First Class Judicial Magistrate Sudhir Barde) यांच्या न्यायालयात हे प्रकरण निकाली काढण्यात आले. तर इतर पाच प्रकरणे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी चिंतामण शेळके (First Class Magistrate Chintaman Shelke) यांच्या न्यायालयात निकाली निघाले.

सह दिवाणी न्यायाधीश जागृती भाटिया (Civil Judge Jagruti Bhatia) यांनी दोन प्रकरणात वयोवृद्ध व्यक्ती असल्याने दुरदृश्य प्रणालीद्वारे सुनावणी घेतली. जिल्हा न्यायाधीश भूषण क्षीरसागर (District Judge Bhushan Kshirsagar) यांच्या पॅनलवर ११३ मोटार अपघात प्रकरणात विविध विमा कंपन्यांकडून गरजूंना नुकसान भरपाई मिळाली. दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर राजेंद्र तांबे (Civil Judge Senior Level Rajendra Tambe) यांच्या पॅनलवर घेण्यात आलेल्या १८२५ प्रकारणांपैकी ११८ जमीन अधिग्रहण प्रकरणे निकाली काढण्यात येऊन ११ कोटी ९५ लाख ३९ हजार रुपये एवढी रक्कम वसूल करण्यात आली.

 

पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे घेण्यात आलेल्या आठ राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये ९ लाखापेक्षा जास्त दाखल
असलेली व दाखलपूर्व प्रकरणे निकाली काढण्यात आली.
अशा प्रकारे पुणे जिल्ह्याने राष्ट्रीय लोक अदालतीच्या आयोजनादरम्यान दावे निकाली काढण्यात
अग्रेसर राहण्याची परंपरा कायम राखली आहे.
या यशस्वी आयोजनासाठी जिल्ह्याच्या सर्व न्यायालयातील अधिकारी-कर्मचारी,
विविध विभागांचे अधिकारी आणि नागरिकांचे चांगले सहकार्य मिळाले आहे.

 

पुढील लोक अदालत ३० एप्रिल रोजी

पुढील राष्ट्रीय लोकअदालत शनिवार ३० एप्रिल २०२३ रोजी पुणे जिल्ह्यातील
सर्व न्यायालयांमध्ये आयोजित करण्यात येणार आहे.
तरी, सदर लोकन्यायालयामध्ये जास्तीत जास्त पक्षकारांनी सहभागी होवून
आपापली प्रकरणे सामंजस्याने व तडजोडीने निकाली काढुन घेण्याचे आवाहन
विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर मंगल कश्यप (Mangal Kashyap) यांनी केले आहे.

 

 

Web Title :- National Lok Adalat | Pune district is first in the state in
settling claims for the ninth time in a row

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा