Sandipan Bhumre | संदीपान भुमरे यांनी 9 दारूची दुकाने उघडली, अजित पवारांच्या टीकेला भुमरेंचा पलटवार; म्हणाले…

सिंधुदुर्ग : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) आणि मंत्री संदीपान भुमरे (Sandipan Bhumre) यांच्यात शाब्दिक हल्लाबोल होत आहे. संदीपान भुमरे यांना पालकमंत्रीपद मिळाल्यानंतर संदीपान भुमरे (Sandipan Bhumre) यांनी नऊ दारुची दुकाने (Liquor Stores) उघडली अशी टीका अजित पवार यांनी केली. त्यांच्या टीकेवर भुमरे यांनी जोरदार पलटवार केला आहे. ते रविवारी सिंधुदुर्ग येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

 

अजीत पवार यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना संदीपान भुमरे (Sandipan Bhumre) म्हणाले, अजित पवार यांनी कितीही टीका करावी. परंतु 2024 मध्ये महायुतीचेच सरकार येणार. त्यांनी आम्हाला गद्दारी विषयी सांगू नये. सकाळी पहाटे उठून ते कोठे गेले होते, कोणी गद्दारी केली, हे सर्वांना माहिती आहे, असे भुमरे म्हणाले.

 

भूमरे पुढे म्हणाले, अजित पवार यांच्याकडून मला तशी अपेक्षा नव्हती. ते खालच्या पातळीवर जाऊन टीका करत आहेत. आम्ही त्यांना सत्तेतून पायऊतार केलेले आहे म्हणूनच ते आमच्यावर अशा प्रकारची टीका करत आहेत. त्यांनी कितीही टीका केली तरी 2024 मध्ये महायुतीचीच सत्ता येणार आहे. आमचे 40 लोक फुटले म्हणत अजित पवार यांनी आम्हाला शिकवण्याची गरज नाही. ते पहाटे उठून कोठे गेले होते. ते आम्हाला गद्दार म्हणू शकत नाहीत. कारण पहाटे कोणी गद्दारी केली ते सगळ्यांना माहिती आहे, असा खोचक टोला संदीपान भुमरे यांनी लगावला.

 

काय म्हणाले अजित पवार?

अजित पवार शनिवारी पैठण दौऱ्यावर असताना त्यांनी एका सभेत बोलताना संदीपान भुमरे यांच्यावर टीका केली.
पैठण तालुक्यात (Paithan Taluk) शाळा, मेडिकल कॉलेज रुग्णालय, रस्ते होण्याची अपेक्षा होती.
पण, मंत्री आणि पालकमंत्री पद मिळाल्यानंतर 9 दारूची दुकाने उघडली.
दुकानासमोर गतिरोधक बसवले का तर… गाडी थांबावी आणि गिऱ्हाईकाने थांबत टाकून जावं…
उलट लहान मुले-मुलींना त्रास होऊ नये म्हणून शाळे जवळ गतिरोधक बसवतो.
परंतु या पद्धतीने स्वत:ची दुकाने चालवण्यासाठी गतिरोधक बसवतात.
कुठे फेडाल हे पाप, तळतळाट लागेल, असे अजित पवार म्हणाले.

 

 

Web Title :- Sandipan Bhumre | minister sandipan bhumre criticizes ajit pawar on morning or event

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा