‘भारतातील शौचालय पाहण्यासाठी परदेशी पर्यटक येतील’ : मोदी 

कुरुक्षेत्र : वृत्तसंस्था – युरोपातील एका ठिकाणी पर्यटक घरांच्या सुंदर रंगवलेल्या भिंती पाहायला जातात. एक दिवस असाही येईल, की परदेशी पर्यटक भारतातील शौचालयं पाहण्यासाठी येतील, स्वच्छ शक्ती २०१९ या कार्यक्रमातून मोदींनी आज महिलांशी संवाद साधला.

त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हरियाणाच्या कुरुक्षेत्रमधून राज्यातील भाजपाच्या प्रचाराला सुरुवात केली. मोदींचा दौरा राजकीय नसल्याचे राज्य सरकार आणि प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. मात्र मोदींनी विरोधकांना लक्ष्य करत प्रचाराचं रणशिंग फुकले. महिलांना संबोधित करताना पंतप्रधानांनी स्वच्छ भारत अभियानाचे यश सांगितले. ‘मी लाल किल्ल्यावरुन स्वच्छ भारत अभियानाची घोषणा केली, त्यावेळी विरोधकांनी माझी खिल्ली उडवली. त्यावेळी माझ्यावर टीका करणाऱ्या लोकांना महिलांची प्रतिष्ठा महत्त्वाची वाटत नाही,’ असं म्हणत मोदींनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला.

तसेच पुढे  मोदी म्हणाले युरोपातील एका ठिकाणी पर्यटक घरांच्या सुंदर रंगवलेल्या भिंती पाहायला जातात. तसेच एक दिवस असाही येईल की, देशातील शौचालयं पाहण्यासाठी परदेशातून पर्यटक येतील, ‘युरोपात एक ठिकाण असे आहे. त्या ठिकाणच्या घरांच्या भिंती अतिशय सुंदर आहेत. त्यांच्यावरील रंगरंगोटी पाहण्यासाठी परदेशी पर्यटक गर्दी करतात. स्वच्छ शक्ती २०१९ या कार्यक्रमातून मोदींनी आज महिलांशी संवाद साधला.

https://twitter.com/ANI/status/1095239396746555392

या कार्यक्रमाला नायजेरियाहून आलेल्या पाहुण्यांचे पंतप्रधान मोदी यांनी स्वागत केले. ‘स्वच्छ भारत अभियानाला मिळालेलं यश पाहण्यासाठी तुम्ही इथं आलात, अशी माहिती मला मिळाली. असंच अभियान तुम्हाला नायजेरियात राबवायचं आहे. त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. तुमच्या अभियानाला यश मिळो,’ असे ही मोदी  म्हणाले.