MP : वाळु माफियानं पोलिस अधिकार्‍याची केली ‘धुलाई’, म्हणाला – ‘पैसे पण घेताना आणि परेशान देखील करता’

श्योपुर : मध्य प्रदेशच्या श्योपुर जिल्ह्याच्या ग्राम गढीमध्ये रेती माफियाने असिस्टंट सब इन्स्पेक्टर (एएसआय) ला धमकावत कानशीलात मारली आणि धक्का देऊन जमिनीवर आपटले. या घटनेचा व्हिडिओ वायरल झाल्यानंतर हे प्रकरण समोर आले. व्हिडिओत दिसत आहे की, घटनेच्या वेळी एक कॉन्स्टेबल वाळू माफियासमोर गयावया करत आहे. मार खाणार्‍या एएसआयने सुद्धा कोणताही प्रतिकार केला नाही, उलट हात बांधून आणि मान झुकवून वाळू माफियाच्या धमक्या आणि अपशब्द ऐकत असताना ते दिसत आहेत. यानंतर वाळू माफिया ट्रॅक्टर-ट्रॉली घेऊन गेला.

चेकिंग करणार्‍या एएसआयला वाळू माफियाने चोपले
माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी सुमारे आठ वाजता गढी गावात चेकिंग करण्यासाठी गेलेल्या एएसआय राजेंद्र जादौनला वाळू माफियाने यासाठी मारहाण केली की, त्याने वाळूच्या ट्रॅक्टर-ट्रॉली रोखून धरल्या होत्या. वाळू माफियाने एएसआयला अपशब्द वापरत म्हटले, मी जेलमध्ये जायला घाबरत नाही.

पैसेही घेता आणि त्रासही देता
एंट्रीच्या नावाने पैसे घेता, तरीही त्रास देता, असे म्हणत वाळू माफिया एएसआय जादौनवर तुटून पडतो. अगोदर कानशिलात मारतो, नंतर धक्का देऊन जमीनीवर आपटतो. यावेळी एसआयसोबतचा काँन्स्टेबल छोटे लाल वाळू माफिया समोर गयावया करतो. एएसआयला मारहाण केल्यानंतर वाळू माफिया आपली ट्रॅक्टर-ट्रॉली घेऊन जाताना व्हिडिओत दिसत आहे. शिवाय, जाता-जाता धमकी देऊन जातो की, आता फोन सुद्धा करू नका, नाही तर चांगले होणार नाही.

पोलिसांच्या गोटात खळबळ
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाल्यानंतर पोलिसांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे, कारण यामध्ये वाळू माफियांशी पोलिसांचे संबंध उघड होत आहेत. तसेच, मार खाऊनही एएसआय आणि कॉन्स्टेबल मान खाली घालून उभे राहिलेले दिसत आहेत. पोलीस अधिकारी एवढेच बोलत आहेत की, सध्या आरोपीवर गुन्हा दाखल केला जात आहे. घटनेशी संबंधित इतर गोष्टींचीही चौकशी केली जाईल.

कॉन्स्टेबलला मारले, सहायक कलेक्टरला सुद्धा धमकावले
गढी गावात पोलीस चेकिंग पॉईंट आहे. सुमारे दोन महिन्यांपूर्वी याच ठिकाणी वाळू माफियाने दोन काँस्टेबलला बेदम मारहाण केली होती. त्यांनी तत्कालीन पोलीस ठाणे प्रभारी सतीश साहू यांच्याकडे तक्रार केली परंतु वाळू माफियांवर कोणतीही कारवाई झाली नाही. उलट तीन दिवसांनंतर दोन कॉन्स्टेबलला लाईन अटॅच करण्यात आले. 26 जूनला विजयपुरच्या गोहटा रोडवर ट्रॅक्टर-ट्रॉली पकडल्याने 15 पेक्षा जास्त वाळू माफियांनी सहायक कलेक्टर आणि प्रभारी एसडीएम नवजीवन विजय आणि तहसीलदार अशोक गोबडिया यांना धक्काबुक्की केली. वाळू माफिया त्यांना धमकी देत ट्रॅक्टर-ट्रॉली घेऊन गेले.