Coronavirus : ‘ही’ अ‍ॅन्टी व्हायरल टॅबलेट ‘कोरोना’च्या उपचारात मदतगार, ‘स्ट्राइड्स फॉर्मा’चा दावा

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था  –  जगभरात कोरोना व्हायरसमुळे कहर माजला आहे. या साथीच्या रोगावर अद्याप कोणतीही लस उपलब्ध झालेली नसून प्रत्येक देश कोरोनावर लस बनवण्याचा प्रयत्न करत आहे. अशातच आता स्ट्रयड्स फार्मा सायन्स लिमिटेडने बुधवारी दावा केला आहे की फविपीरावीर अँटीव्हायरल टॅब्लेट कोरोनाच्या उपचारावर प्रभावी आहेत. जगभरात कोरोनाच्या उपचारासाठी या टॅब्लेटचे परिणाम सकारात्मक आले आहेत. कंपनीने असेही म्हटले आहे की, त्यांनी या औषधाचे उत्पादन आणि विक्री सुरु केली आहे.

एका वृत्तसंस्थेला माहिती देताना कंपनीने सांगितले की, फेविपीरावीर एक अँटीव्हायरल औषध आहे. जे सुरुवातीला जपानमधील इन्फूएंझावर उपचार करण्यासाठी तयार करण्यात आले होते. फेब्रुवारीमध्ये कोरोना विषाणू समोर आल्यानंतर या औषधाचा अभ्यास चीन आणि इतर अनेक देशांमध्ये कोरोनाच्या प्रयोगात्मक उपचारासाठी करण्यात आला. यामुळे सकारात्मक परिणाम झाला असून कोरोनाच्या प्रभावाचा कालावधी कमी तर झालाच शिवाय यामुळे फुफ्फुसांचे आरोग्यही सुधारले. हे औषधाचे उत्पादन जपानमधील टोयोमा केमिकल या कंपनीने केले. स्ट्रईड्स फार्माने म्हटले आहे की, फेविपीरावीर गोळ्याची निर्यात सुरु करणारी ही भारतातील पहिली कंपनी आहे. कंपनीने 400mg आणि 200mg च्या गोळ्या तयार केल्या आहेत.

कंपनीने असेही म्हटले आहे की लवकरच या औषधाबद्दल आवश्यक अभ्यास सुरु करण्यासाठी आणि भारतीय रुग्णांना त्वरित उपलब्ध करून देण्यासाठी ते भारतीय औषध न्यायाधिकरणाकडे अर्ज करणार आहेत. हे औषध दिल्यानंतर या रुग्णांच्या एक्स-रे अहवालात त्यांच्या फफ्फुसातील सुधारणा 91 टक्क्यापर्य़ंत वाढल्याचे दिसून आले आहे. त्याचवेळी ज्यांना दुसरे औषध देण्यात आले त्यांच्यात 61 टक्के सुधारणा झाली आहे. थोडक्यात सांगण्याचे तात्पर्य असे की, कोरोना विषाणूच्या रुग्णांवर इतर औषधांपेक्षा हे औषध प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे. मात्र, जपानने अद्यापपर्यंत अशाप्रकारे यशस्वी झाल्याचा कोणताही दावा केलेला नाही.