मराठा आरक्षणासाठी राष्ट्रवादी राष्ट्रीय युवक संघटनेचा दिल्लीत मोर्चा

दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन

मराठा आरक्षणासाठी आणि खुल्या वर्गातील सर्  विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये ५० टक्के आरक्षण मिळावे. तसेच सवलतीची काटोकोर अंमलबजावणी व्हावी. या मागणीसाठी राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय युवक अध्यक्ष धीरज शर्मा यांच्या नेतृत्वाखाली संसदेला घेराव घालण्यासाठी  मोर्चा काढण्यात आला. परंतु दिल्ली पोलिसांनी हा मोर्चा संसदेच्या जवळ आडवला.
[amazon_link asins=’B0785JJF7L’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’5f16264f-9b0c-11e8-8647-63462f68cc6b’]

मोर्चामध्ये सहभागी झालेल्यांना मार्गदर्शन करताना धीरज शर्मा म्हणाले, मी जरी दिल्लीचा असलो तरी माझे शिक्षण महाराष्ट्रातील पुण्यात झाले आहे. महाराष्ट्रात मराठा समाजावर अन्याय झाला आहे. कॉलेजमध्ये शिकत असताना मराठा समाजातील विद्यार्थ्यांवर होत असलेला अन्याय मी माझ्या डोळ्यांनी पाहिला आहे. मराठा समाज हा सर्व घटकांमध्ये मागास आहे. मराठा समाजाच्या व्यथा अत्यंत भयंकर आहेत, तसेच नोकरी आणि शिक्षणात देखील मराठा समाजावर अन्याय होत असताना हे भाजप सरकार गप्प का आहे असा सवाल देखील शर्मा यांनी उपस्थित केला.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी काकासाहेब शिंदे यांनी बलिदान दिले. काकासाहेब शिंदे यांच्या कुटुंबाला ५० लाखांची मदत देण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. मराठा समाजातील अनेक युवक, युवती आरक्षणासाठी आत्महत्या करीत आहेत. तरी देखील शासनाला जाग येत नाही. शासनाला जाग यावी यासाठी हा मोर्चा काढण्यात आला असल्याचे धीरज शर्मा यांनी सांगितले. यावेळी मराठा आरक्षणासाठी जीवाचे बलिदान दिलेल्याना संसद परिसरात भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी कार्याध्यक्ष सुहास कदम यांचेसह युवक मोठ्यासंखेने हजर होते.