Natural Ways to Reduce Headache | पेनकिलर्स घेण्यापेक्षा ‘या’ 7 घरगुती पद्धतीने बरी करा डोकेदुखी, झोप सुद्धा लागेल शांत

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Natural Ways to Reduce Headache | डोकेदुखी ही सर्वात सामान्य समस्या आहे. जगात क्वचितच अशी कोणतीही व्यक्ती असेल ज्याला कधीही डोकेदुखी (Headache) झाली नसेल. असे काही लोक आहेत ज्यांची सकाळ डोकेदुखीने सुरू होते. डोकेदुखीची अनेक कारणे आहेत. झोपेचा अभाव, तणाव, थकवा, वैद्यकीय स्थिती, आवाज इ. कधीकधी असे होते की डोकेदुखीचे कारण समजत नाही. (Natural Ways to Reduce Headache)

 

अशावेळी, बरेच लोक वेदनाशामक औषधांचा अवलंब करतात. त्यांना वेदनाशामक गोळी खाण्याची इतकी सवय होते की त्यांना हलके दुखत असले तरी ते पुन्हा पुन्हा पेनकिलर (Painkiller) घेण्यास सुरुवात करतात, तर नेहमी पेनकिलर खाणे आरोग्याला जड होऊ शकते. यामुळे तुम्हाला आरोग्याच्या अनेक समस्याही उद्भवू शकतात. डोकेदुखीचा त्रास असल्यास कोणते उपाय करावेत ते जाणून घेवूयात. (Natural Ways to Reduce Headache)

 

1. हेड मसाज (Head Massage)
हेड मसाज कधीही हलक्यात घेऊ नका, विशेषतः जर डोकेदुखी असेल तर कोणत्याही तेलाने हेड मसाज करा. यामुळे तुमच्या मज्जातंतूंना खूप आराम मिळतो आणि डोकेदुखीपासूनही आराम मिळतो.

 

2. आईस पॅक (Ice Pack)
बर्फाचे तुकडे कापडात गुंडाळा आणि कपाळावर हलके दाबा. यामुळे तुम्हाला दुखण्यापासून आराम मिळेल. थोड्याथोड्या वेळाने कपाळावर आईस पॅक देखील लावू शकता. डोकेदुखी बरी करण्यासाठी हा सर्वात प्रभावी उपाय आहे.

 

3. हॉट राईस बॅक (Hot Rice Back)
यासाठी कच्चे तांदूळ तव्यावर गरम करा. यानंतर हे तांदूळ एका पॉलीबॅगमध्ये भरा. याच्या मदतीने कपाळावर हलका शेक द्या. यामुळे डोकेदुखीही दूर होईल.

4. लव्हेंडर तेल (Lavender oil)
अरोमाथेरपीमध्ये लॅव्हेंडर तेल वापरले जाते. यामुळे तुम्हाला शांतता आणि आराम मिळतो. यासाठी प्रथम लॅव्हेंडर तेल गरम करा आणि अशा ठिकाणी ठेवा, ज्यामुळे सुगंघ येत येईल.

 

5. पाणी (Water)
कधीकधी पाण्याच्या कमतरतेमुळे डोके दुखते. यासाठी शरीराला हायड्रेट ठेवा आणि कमीत कमी दोन ग्लास थंड पाणी लवकर प्या. त्यामुळे डोकेदुखीतही खूप आराम मिळतो.

 

6. ब्रिथिंग एक्सरसाईज (Breathing Exercise)
कमीतकमी 10 मिनिटे ब्रिथिंग एक्सरसाईज करा. ही एक्सरसाईज केल्याने खूप आराम मिळतो.
ब्रिथिंग एक्सरसाईजमुळे मज्जातंतूंना खूप आराम मिळतो.

 

7. आयुर्वेदिक चहा (Ayurvedic Tea)
आयुर्वेदिक चहा देखील डोकेदुखी दूर करण्यासाठी प्रभावी मानला जातो. तुम्ही मसाला चहा देखील पिऊ शकता.
गरमागरम चहा घोट-घोट पिण्याचा प्रयत्न करा. थंड चहामुळे तुमची डोकेदुखी वाढू शकते.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Natural Ways to Reduce Headache | cure headache with these home remedies instead of taking painkillers

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | बहिणीच्या मुलाने मुलीला पळवून नेल्याच्या रागात महिला व मुलीला पळवून नेऊन केला बलात्कार करण्याचा प्रयत्न

 

Maharashtra Monsoon Session | आमदार महेश शिंदेंनी शिवीगाळ, धक्काबुक्की केली – अमोल मिटकरी

 

Jumbo Covid Centre Scam | जम्बो कोविड सेंटर घोटाळा प्रकरणात संजय राऊतांसह त्यांचा मित्र अडचणीत, पोलिसांत तक्रार