‘या’ कारणामुळं युवा गोलंदाज नवदीप सैनीवर ICC ची कारवाई, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – वेगवान गोलंदाज नवदीप सैनीने फ्लोरिडा येथे वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या जाणार्‍या तीन सामन्यांच्या मालिकेच्या पहिल्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात भारतीय संघाकडून पदार्पण केले. त्या सामन्यात नवदीप सैनीला सामनावीराचा पुरस्कार मिळाल्यामुळे नवदीप सैनीसाठी हे दमदार प्रदर्शन ठरले.

नवदीप सैनीने ४ षटकांत एकूण १७ धावा दिल्या आणि या सामन्यात ३ बळी घेतले, ज्यामध्ये डावातील २०वे षटक निर्धाव टाकले. पण आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) नवदीप सैनीला या सामन्यात नियम मोडल्याबद्दल शिक्षा सुनावली आहे.आयसीसीने नवदीप सैनीला आयसीसीचा कलम २.५ तोडल्याबद्दल दोषी ठरवले आहे.

आयसीसीने म्हटले की, नवदीप सैनीने खेळाडूला बाद केल्यानंतर त्या खेळाडूकडे पाहून चिथावणीखोर वर्तन केले. वेस्ट इंडिजच्या डावाच्या चौथ्या षटकात निकोलस पूरनला बाद करून नवदीप सैनीने काही हातवारे केले. आयसीसीने नवदीप सैनीच्या खात्यात एक डिमेरिट पॉईंट जोडला आहे. वेस्ट इंडिज विरुद्धच्या डावात चौथ्या षटकात निकोलस बाद झाल्यानंतर नवदीप सैनीने काही चिथावणीखोर इशारे केले होते.

वेगवान गोलंदाज नवदीप सैनीने आरोपाची कबुली दिली आहे आणि आयसीसीचे रेफरी जेफ क्रो यांनी दिलेल्या शिक्षेचा नवदीपने स्वीकार केला आहे. यामुळे या प्रकरणात या खेळाडूवर कोणतीही सुनावणी होणार नाही. अंपायर नायजेल ड्यूड आणि ग्रेगरी ब्रेथवेट, थर्ड अंपायर लेस्ली रेफर आणि फोर्थ अंपायर पॅट्रिक गुस्टार्ड यांनी नवदीप सैनी यांच्यावर हा आरोप लावला.

आरोग्यविषयक वृत्त

 

Loading...
You might also like