‘सुरमा भोपाली’ जगदीपला ‘या’ सिनेमासाठी मिळाले होते 6 रुपये, मुलगा जावेद जाफरीनं शेअर केला व्हिडीओ !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  बॉलिवूडमधील महान कलाकारांपैकी एक जगदीप यांनी 8 जुलै 2020 रोजी जगाचा निरोप घेतला. मुलगा जावेद जाफरी यांनी वडिलांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ जगदीप यांच्या अफसाना या पहिल्या सिनेमातील आहे. या सिनेमात त्यांनी बालकलाकार म्हणून काम केलं होतं. व्हिडीओ शेअर करताना जावेदनं लिहिलं की, वडिलांच्या प्रवासाची सुरुवात. सिनेमात तुम्ही लहान जगदीपला पाहू शकता. जावेदनं शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या सोशलवर व्हायरल होत आहे. अनेक चाहते यावर कमेंट करत प्रतिक्रिया देखील देत आहेत.

उर्दूमुळं वाढवून मिळाली होती फी

फाळणीनंतर जगदीप मुंबईच्या फूटपाथवर जीवन घालवत होते. 10 व्या वर्षीच त्यांनी आपलं अॅक्टींग करिअर सुरू केलं होतं. एका मुलाखतीत जगदीप यांनी सांगितलं की, एकदा रस्त्यावर अचानक एक माणूस मला भेटला. त्यानं मला सिनेमात काम करण्याबद्दल विचारलं. मी विचारलं काय काम आहे. कारण मी कधी सिनेमे पाहिलेच नव्हते. त्यानं मला सांगितलं सिनेमात अॅक्ट करायचं आहे. मी विचारलं की, किती पैसे मिळतील. त्यानं सांगितलं 3 रुपये. मी म्हणालो चला लगेच. तर तो म्हणाला मी उद्या येईल.”

जगदीप पुढे म्हणाले, “मी आईसोबत गेलो. बी आर चोपडाचा सिनेमा होता. त्या नावं होतं अफसाना. तिथं मुलांचा ड्रामा सुरू होता आणि ऑडियंसमध्ये खाली बसून काही मुलं ड्रामा पहात होते. जे ड्रामा पहात होते त्यांच्या मीही होतो.”

जगदीप सांगतात, “एक उर्दू डायलॉग होता आणि उर्दू बोलणारं कुणी पाहिजे होतं. तिथं काही गुजराती आणि महाराष्ट्रीयन मुलंही होती. मी शेजारच्या मुलाला विचारलं की, मी उर्दू बोललो तर मला किती रुपये मिळतील तर त्या मुलानं सांगितलं की, 3 रुपयांचे 6 रुपये होतील. उर्दू बोलणार मुलगा त्यांना हवा होता आणि माझी भाषा उर्दू होती. मी हात वर केला. त्यावेळी यश चोपडा असिस्टंट डायरेक्टर होते. मी लगेच डायलॉग बोलून दाखवला. तिथूनच माझा फिल्मचा प्रवास सुरू झाला.”

यानंतर जगदीप यांना सिनेमे मिळण्यास सुरुवात झाली आणि चाईल्ड आर्टीस्ट वरून ते फिल्ममेकर्सची पसंत बनले. तारुण्यात शोले सिनेमात त्यांनी साकारललेा सुरमा भोपाली खूप गाजला. त्यांना इतकं प्रेम मिळालं की, लोक त्यांचं खरं नाव विसरून त्यांना सुरमा भोपाली म्हणूनच हाक मारायला सुरुवात केली होती.