Navneet Rana | ‘धनुष्यबाण’ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच मिळणार – खा. नवनीत राणा

अमरावती : पोलीसनामा ऑनलाईन – शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर खरी शिवसेना कुणाची? यावर शिंदे गट आणि ठाकरे गटाकडून दावे करण्यात आले आहेत. तसेच हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून याबाबत निवडणूक आयोग तसेच सुप्रीम कोर्टाने स्थापन केलेले घटनापीठ याबाबचा निर्णय घेणार आहे. त्यावर आता धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटालाच मिळणार असल्याचा दावा खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी केला आहे. त्या अमरावती येथे बोलत होत्या. (Navneet Rana)

जे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचे विचार घरात ठेवू शकले नाहीत ते सत्तेसाठी काय संघर्ष करणार? असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत असून, धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटालाच मिळणार. असा विश्वास त्यांनी (Navneet Rana) यावेळी बोलताना व्यक्त केला.

उद्धव ठाकरेंवर निशाना साधत त्या म्हणाल्या की, ‘ उद्धव ठाकरे सरकार फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून अडीच वर्ष चालले. हनुमान चालीसा वाचली म्हणुन एका लोकप्रतिनिधीला १३ दिवस तुरूंगात टाकण्यात आले. बाळासाहेब ठाकरे यांचे विचारच यांनी घरात ठेवले नाहीत.मग यांचं काय होईल?’ अशी टीका त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.

यावर पुढे बोलताना नवनीत राणा म्हणाल्या की,‘ माझा देवावर आणि हनुमान चालिसेवर पूर्ण विश्वास आहे.
येणाऱ्या काळात बाळासाहेबांची विचारधारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहे.
आणि त्यांनाच धनुष्यबाण मिळेल. आणि त्याच चिन्हावर ते आपले उमेदवार रिंगणात उतरवतील.’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, मातोश्री या तत्कालिन मुख्यमंत्र्यांच्या खासगी निवासस्थानासमोर हनुमान चालिसा पठणाचा प्रयत्न राणा
दाम्पत्याकडून करण्यात आला होता. त्यावर मुंबई पोलिसांनी राणा दाम्पत्याला अटक देखील केली होती.
नुकतच त्यांनी या प्रकरणात आम्हाला आरोपमुक्त करण्यात यावं. असं न्यायालयात लेखी सादर केली आहे.
त्यावर मुंबई पोलिसांना उत्तर देण्याचे न्यायालयाने सांगितले आहे.

Web Title :- Navneet Rana | i believe in hanuman chalisa dhanushyabaan will be given to eknath shinde only says navneet rana

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Kanjhawala Accident Case | अंजली सिंह अपघातप्रकरणी 2 पोलीस उपनिरीक्षक, 4 सहायक उपनिरीक्षक, 4 हेड कॉन्स्टेबल आणि 1 कॉन्स्टेबल निलंबीत

Amol Mitkari | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांचा भाजप खासदार किरीट सोमय्यांवर निशाणा

Amit Deshmukh | भाजप प्रवेशाबाबत स्पष्टचं बोलले अमित देशमुख; म्हणाले…