Navneet Rana | मुंबई पोलीस (Mumbai Police) आणखी एक व्हिडिओ रिलीज करणार असल्याने नवनीत राणा यांच्या अडचणीत वाढ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पोलीस कोठडीत अपमानास्पद वागणूक मिळत असल्याचा आरोप खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी केला होता. त्यानंतर मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे (CP Sanjay Pandey) यांनी पोलीस ठाण्यातील एक व्हिडीओ ट्विट करुन नवनीत राणा (Navneet Rana) यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. संजय पांडे यांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) हे चहा पीत असल्याचे व्हिडिओत दिसत आहेत.

 

पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी राणा दाम्पत्याचा (Rana Couple) खार पोलीस ठाण्यातील (Khar Police Station) व्हिडिओ ट्विट केल्यानंतर राणा यांचे वकील रिझवान मर्चंट (Lawyer Rizwan Merchant) यांनी एक दावा केला आहे. राणांना खार पोलीस स्टेशनमध्ये नाही तर सांताक्रूझ पोलीस ठाण्यात (Santa Cruz Police Station) हीन वागणूक दिल्याची तक्रार केल्याचा मर्चंट यांचा दावा आहे.

 

खार पोलिसांनंतर आता संताक्रूझ पोलीस हे खासदार नवनीत राणा (Navneet Rana)  यांच्यासंबंधीचे सीसीटीव्ही फुटेज जारी करणार असल्याचे मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) सांगितले आहे.
संताक्रूझ पोलीस ठाण्यातील लॉकअपमधील हा व्हिडिओ असण्याची शक्यता आहे. पोलिसांनी त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले आहे.
राणा यांच्याशी योग्य पद्धतीने व्यवहार केला, त्यांना ऑफिसर्ससाठी असलेल्या टॉयलेटचा वापर करु दिल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
या सर्व गोष्टी पोलीस स्टेशनमधील सीसीटीव्हीमध्ये चित्रीत झाल्या आहेत.
त्यामुळे राणा आणि त्यांचे वकिल रिझवान मर्चंट हे खोटा दावा करत आहेत की काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

 

Web Title :- Navneet Rana | navneet rana in troubles mumbai police will release another video

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

BJP On CM Uddhav Thackeray | ‘हिटलरही असाच अहंकारी होता’, भाजपने कार्टुनच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांची उडवली खिल्ली

 

Gunaratna Sadavarte | अखेर गुणरत्न सदावर्ते यांची 18 दिवसांनंतर तुरुंगातून सुटका; तुरुंगातून बाहेर येताच…

 

Navneet Rana on Sanjay Raut | नवनीत राणा यांची संजय राऊत यांच्याविरोधात नागपूर पोलिस आयुक्तांकडे तक्रार; गुन्हा दाखल करण्याची मागणी