Navneet Rana | नवनीत राणांचे जात प्रमाणपत्र वैध

नवी दिल्ली : Navneet Rana | सुप्रीम कोर्टात (Supreme Court) जात प्रमाणपत्राच्या मुद्द्यावर नवनीत राणांना मोठा दिलासा मिळाला.

हायकोर्टाचा निकाल रद्द ठरवत सुप्रीम कोर्टाने नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र वैध मानले आहे. (Navneet Rana)

भाजपने आधीच राणा यांना आपल्या तिकीटावर उमेदवारी जाहीर केली होती. अमरावती येथील खासदार नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्र बाबत बहुचर्चित असलेला निकाल गुरुवारी आला आहे. सुप्रीम कोर्टाने नवनीत राणा यांना दिलासा दिला आहे. नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्रावर शिक्कामोर्तब केले आहे.

यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी नवनीत राणा यांना दिलासा मिळाला आहे. नवनीत कौर-राणा या चित्रपट अभिनेत्री असून त्यांनी बडनेराचे आमदार रवी राणा यांच्‍याशी २०११ मध्‍ये विवाह केला होता. विवाहानंतर त्यांनी अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र मिळवले होते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Wagholi Crime | वाघोली येथील बिवरी गावात दरोडा, चाकूचा धाक दाखवून दरोडेखोरांनी लुटला 16 लाखांचा ऐवज

Pune Water Crisis-Traffic Issue | आम्हाला प्यायला पाणी आणि कोंडीमुक्त रस्ते कसे देणार? लोकसंख्येच्या विस्फोटामुळे पुण्याच्या पाण्याचा आणि वाहतुकीचा प्रश्न अतिगंभीरतेच्या दिशेने

Pimpri Murder Case | पिंपरी : मित्राचा खून करुन फरार झालेल्या आरोपीला मध्य प्रदेशातून अटक